हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज महात्मा गांधी यांची 154 वी जयंती आहे. महात्मा गांधी यांनी नेहमी सत्याचा आणि अहिंसेच्या मार्गाचा अवलंब केला. आज महात्मा गांधी जरी आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आजही जिवंत आहेत. महात्मा गांधी यांचे जीवन आणि त्या जीवनातील तत्वे देशांतील प्रत्येक व्यक्तीला प्रेरित करणारी आहेत. खास करून त्यांनी ज्या तत्वांचा अवलंब केला ती तत्वे विद्यार्थ्याला जगण्याची शिकवण देणारी आहेत. आज आपण महात्मा गांधी यांनी अवलंबलेल्या याच पाच तत्वांविषयी जाणून घेणार आहोत. या तत्त्वांचा विद्यार्थ्यांनी अवलंब केल्यास त्यांना देखील आयुष्यात यश संपादन करता येईल.
अहिंसेची ताकत
महात्मा गांधी यांनी अहिंसेचा मार्ग संपूर्ण आयुष्यात कधीच सोडला नाही. महात्मा गांधी यांनी सर्वांना अत्यंत महत्त्वाचा आणि मौल्यवान धडा दिला तो म्हणजे अहिंसेच्या मार्गाचा. या मार्गाचा अवलंब करून महात्मा गांधींनी हे सिद्ध केले की, शांततापूर्ण प्रतिकाराने महत्त्वपूर्ण सामाजिक आणि राजकीय बदल घडवून आणू शकतात. या धड्यातून शालेय विद्यार्थ्यांनी हे शिकले पाहिजे की, प्रत्येक प्रश्न हा कोणताही संघर्ष किंवा हिंसा न करता समजूतदार पद्धतीने देखील सोडवला जाऊ शकतो.
सत्य आणि प्रामाणिकपणा
सत्य आणि प्रामाणिकपणा ही महात्मा गांधींनी शिकवलेली मूलभूत मूल्ये आहेत. स्वातंत्र्य लढ्यातील आपल्या प्रयत्नातून महात्मा गांधींनी आपल्याला दाखवून दिले की फक्त सत्याचाच विजय होतो. महात्मा गांधी यांनी कायम सत्याचे जीवन जगले आणि सत्याचा शोध घेतला. यातून विद्यार्थ्यांना हे शिकायला मिळते की, आयुष्यात कोणताही प्रसंग आला तरी अंगी असलेला प्रामाणिकपणा आणि सत्याची बाजू कधीही सोडायची नाही.
माफ करणे
महात्मा गांधी यांनी आपल्याला शिकवले की शमा आहे सशक्त चारित्र्याचे लक्षण आहे. कमकुवत लोक राग धरतात आणि सूडाची योजना आखतात. मात्र माफी हा एकता निर्माण करण्याचा मार्ग आहे. इतरांना क्षमा केल्याने आपण एकत्र येऊ शकतो आणि आपल्यातील मतभेदांवर मात करू शकतो. तसेच आपण आपल्या चुकीची देखील तिथे तितक्याच प्रामाणिकपणे माफी मागायला हवी.
चिकाटी – संयम
जोपर्यंत एखादी गोष्ट साध्य होत नाही तोपर्यंत ती गोष्ट आपल्याला नेहमीच कठीण वाटते. जेव्हा गोष्टी कठीण होतात तेव्हा आपण अनेकदा हार मानतो. मात्र महात्मा गांधींनी आपल्या जीवनातील अनुभवातून देतात की, वाट कितीही कठीण असली तरी चिकाटी आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जाऊ शकते. या दोन गोष्टींमुळेच महात्मा गांधी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला स्वातंत्र्य करू शकले.
शिक्षणाचे महत्त्व
महात्मा गांधी यांनी वैयक्तिक विकास आणि राष्ट्र उभारणीत शिक्षणाचे महत्त्व सांगितले आहे. व्यक्तीच्या आयुष्यात व्यावसायिक आणि मूलभूत शिक्षण अत्यंत आवश्यक आहे. ही गोष्ट महात्मा गांधी यांनी पटवून दिली. सकारात्मक बदलासाठी शिक्षण हे सशक्त साधन आहे हे देखील महात्मा गांधी यांनी सांगितले. महात्मा गांधी यांच्या आयुष्यातील ही पाच महत्त्वाची तत्वे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरू शकतात.