हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच शिक्षक भरती संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. येत्या 2 महिन्यांत शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे याबाबतची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. तसेच, “शाळा बंद करण्याचे सरकारचे कोणतेही धोरण नाही. त्यामुळे शाळा बंद होणार नाही. अंगणवाडी असलेल्या ठिकाणी ज्युनिअर केजी, सीनिअर केजी सुरू केली जाणार आहे” असे केसरकर यांनी सांगितले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी लहान शाळा एक शिक्षकी शाळा बंद करण्याचे सरकारचे धोरण असल्याचा आरोप केला होता. याविषयीच बोलताना, दीपक केसरकर यांनी ही मोठी माहिती दिली आहे. या माहिती बरोबरच त्यांनी येत्या दोन महिन्यांमध्ये शिक्षक भरती करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या शिक्षकांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, शाळा बंद केल्या शाळाबाह्य मुलांच्या संकेत वाढ होईल अशी भीती जयंत पाटील यांनी व्यक्त केले होते. तसेच भाजपचे ॲड. आशिष शेलार यांनीही फक्त पंधरा दिवसात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आल्याच्या गोष्टीकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. इतकेच नव्हे तर नाना पटोले यांनी राज्यात शिक्षकांचे सव्वा लाख पदे रिक्त असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर वडेट्टीवार यांनी शिक्षकांची पदे कधी भरणार असा प्रश्न सरकार पुढे उपस्थित केला होता. या सगळ्या गोंधळामध्येच केसरकर यांनी ही मोठी माहिती दिली आहे.