सर्वसामान्याना झटका !!! खाद्य तेलाचे दर वाढण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारत सरकार देशात आयात होणाऱ्या खाद्य तेलावर आयात शुल्क वाढवण्याचा विचार करत आहे. यासंदर्भात लवकरच घोषणा होऊ शकते. खाद्य तेल ही दैनंदिन जीवनातील महत्वाची गरज असल्याने त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य लोकांच्या बजेटवरही होण्याची शक्यता आहे.

देशात एकूण गरजेच्या केवळ 40 टक्के खाद्य तेल बनतं. बाकी 60 टक्के तेल परदेशातून आयात केलं जातं. परदेशातून खाद्य तेल येत असल्यामुळे, देशात तेलबिया पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत नाही. यामुळे देशभरातील शेतकरी संघटना दीर्घ काळापासून परदेशी तेलावर आयात शुल्क वाढवण्याची मागणी करत होत्या.

ही सतत वाढती मागणी लक्षात घेता सरकारने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली दोन वेळा बैठक घेतली.  पुढील महिन्यात आणखी एक बैठक होणार आहे. या बैठकीत आयात शुल्काच्या विषयावर अंतिम निर्णय घेतला जाईल. सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आयात शुल्क वाढल्यास परदेशातून येणारं खाद्य तेल महाग होईल. यामुळे देशातील शेतकऱ्यांदेखील त्यांच्या उत्पादचा चांगला भाव मिळू शकेल. त्याशिवाय आत्मनिर्भर भारत अभियानालाही बळ मिळेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment