हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वाढत्या गॅस दरवाढीमुळे महिला स्वयंपाक करताना अगदी जपून आणि काटकसरीने गॅस वापरत आहेत. मात्र, गॅस घेतल्यानंतर तो किती दिवसांनी संपणार असा काहीसा अंदाज महिला बांधत असतात. पण कधीकाळी तो लवकरच संपतो. त्यावेळी संपलेली गॅसची सिलेंडर टाकी उचलून पाहिल्यास ती काहीशी जड लागते. त्या एलपीजी सिलेंडरच्या टाकीत किती गॅस शिल्लक आहे माहिती करून घेण्यासाठी कहाणी टिप्स आहेत. त्या आज आपण हे जाणून घेऊया…
आजच्या काळात जवळपास प्रत्येकजण एलपीजी वापरत आहे. अनेक वेळा असे घडते की गॅसची गरज भासते आणि अचानक गॅस संपल्याचे दिसून येते. एलपीजी सिलिंडर वापरणे खूप सोपे आहे, परंतु सिलिंडरमध्ये किती गॅस (Gas) शिल्लक आहे हे शोधणे खूप कठीण आहे.
सिलेंडर टाकीतील गॅस सप्त आल्यास गॅसच्या ज्वालाचा रंग निळ्यापासून पिवळ्यामध्ये बदलतो. असा अंदाज काहीजण लावतात. पण, हा फक्त एक अंदाज आहे. ते बरोबर असण्याची शक्यता फारच कमी असते. स्टोव्हच्या बर्नरमध्ये कोणत्याही समस्येमुळे ज्वालाचा रंग देखील बदलू शकतो. त्यामुळे याहीपेक्षा अशी सोपी पद्धत आहे कि त्याद्वारे आपण गॅस संपला आहार कि नाही हे तपासून पाहू शकतो.
गॅस किती शिल्लक आहे हे फक्त ओल्या कपड्याच्या मदतीने तपासू शकता. यासाठी सर्वप्रथम एक कपडा पाण्यात भिजवावा. आता तुम्हाला गॅस सिलेंडरने ओले कापड गुंडाळावे लागेल. सुमारे 1 मिनिट पूर्ण झाल्यानंतर, हे कापड काढून टाका. आता उशीराने सिलेंडरवर होत असलेले बदल काळजीपूर्वक पहा. थोड्याच वेळात तुम्हाला दिसेल की सिलेंडरचा काही भाग सुकलेला आहे, तर काही भाग अजूनही ओला आहे.
अशी क्रिया केल्यास सिलेंडरचा रिकामा भाग गरम होतो आणि पाणी लवकर शोषले जाते. त्याचबरोबर सिलिंडरचा ज्या भागामध्ये गॅस भरला जातो, तो भाग तुलनेने थंड राहतो. त्यामुळे त्या ठिकाणचे पाणी सुकायला थोडा वेळ लागतो, असा पद्धतीने आपण सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे तपासू शकतो.