परभणी – जिल्ह्यातील मानवत येथील युवकाचा कोरोना पॉझिटिव्ह तपासणी अहवाल प्रकारणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. परभणीच्या खासगी व जिल्हा शासकीय प्रयोगशाळेत कोरोना पॉझिटिव आलेल्या तरुणाने या अहवालाला आव्हान देत जालना येथील शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी केली असता, त्या ठिकाणी त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
घशातील लाळेचा किंवा नाकातील नमुना न घेता केवळ मोबाईल क्रमांक घेऊन पाठवलेला अहवाल पॉझिटिव आल्याची तक्रार येथील युवकांनी तहसीलदारांकडे केली होती. या प्रकरणानंतर जिल्हा अधिकारी यांच्या आदेशावरून जिल्हा शल्यचिकित्सकांनी या प्रकरणात चौकशी केली. त्यावेळेस तरुणाला बोलावून घेतले आणि तरुणाचा स्वॅब दुसऱ्यांना तपासणीसाठी घेतला. त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात पॉझिटिव आला. शासकीय यंत्रणेवर विश्वास असल्याने खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केली त्या ठिकाणी देखिला तरुण पॉझिटिव आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.नरेंद्र वर्मा यांनी दिली होती.
तरुणाने या तपासणीला आव्हान देण्यासाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात कोरोना तपासणी केली असता, तेथे हा तरूण निगेटिव्ह आल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आणखीच संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.