काबुल । तालिबानने अफगाणिस्तानात ताबा मिळवल्यानंतर तेथे अशांतता आणि गोंधळाची परिस्थिती आहे. पण या सगळ्यातही अफगाणिस्तानमध्ये तेलाचा पुरवठा सुरूच आहे तर काही बँकांनी कामकाजही सुरू केले आहे. अफगाणिस्तानमधील तेलापासून बँकांपर्यंतच्या व्यवसायावर वर्चस्व गाजवणारी व्यक्ती इथली सर्वात श्रीमंत व्यक्ती मानली जाते. सध्या ती दुबईत राहते.
मीरवाइझ अझीझी नावाच्या या व्यक्तीचे नाव अफगाणिस्तानातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून समोर येते. गोल चेहरा असलेली मध्यम बांध्याची ही गुबगुबीत व्यक्ती. अफगाणिस्तानमधील त्यांचा व्यवसाय वास्तवात बँकिंग आणि तेल उत्पादनांपर्यंत विस्तारला आहे. त्यांनी काबूल विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले आणि नंतर 1988 मध्ये अफगाणिस्तानातून दुबईला गेले.
अझीझीचा जन्म 1962 मध्ये अफगाणिस्तानच्या लगमान प्रांतातील एका पश्तून घराण्यात झाला. तेथे त्यांनी शिक्षण घेतले. मग ते व्यवसायिक जगतात एक मोठे व्यक्तिमत्व म्हणून उदयास आले. असे मानले जात आहे कि, अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या ताब्यानंतर सर्व व्यवसाय धोक्यात आले असले तरी अझीझीचा व्यवसाय मात्र असाच सुरू राहील.
अझीझी आपला संपूर्ण अफगाणिस्तानातील व्यवसाय दुबईतूनच चालवतात. 1989 मध्ये स्थापन केलेल्या अझीझी ग्रुप ऑफ कंपनीजचे ते मालक आहेत. सध्या ही कंपनी अफगाणिस्तानातील सर्वात मोठी बँक चेन, रिअल्टी प्रोजेक्ट, इन्व्हेस्टमेंट आणि हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये काम करते. याशिवाय, आता ते बख्तर बँक ऑफ अफगाणिस्तान नावाच्या इस्लामिक बँकेचे मालकही आहेत, ज्याला त्यांनी टेकओव्हर केले होते.
असे म्हटले जात आहे की, अफगाणिस्तानात येणारे 70 टक्के तेल उत्पादन त्यांच्याच कंपनीद्वारे येते. ज्याचा तालिबान आजही बेधुंदपणे वापर करत आहेत. अफगाणिस्तानातील सर्वात मोठ्या बँकेचे नाव अझीझी बासुका आहे, ते या व्यावसायिक बँकेचे अध्यक्षही आहेत. देशभरात त्यांच्या 80 हून अधिक शाखा आणि सुमारे 110 ATM आहेत. याची सुरुवात 2006 साली अफगाणिस्तानमध्ये झाली. मग ते वेगाने व्यायसाय करू लागले.
त्यांची वैयक्तिक संपत्ती सुमारे 80 मिलियन डॉलर म्हणजे 600 कोटी रुपये आहे. त्यांच्या व्यवसायाची एकूण उलाढाल खूप जास्त आहे. तोतेअफगाणिस्तानातील सर्वात श्रीमंत मानले जातात. त्यांचा दुबईमध्ये मोठा बांधकाम व्यवसाय आहे, त्यांचा पेट्रोलियम व्यवसाय अझीझी होटक ग्रुपच्या नावाखाली चालवला जातो, जो सुमारे 10 देशांमध्ये पसरलेला आहे. ते वेगवेगळ्या क्षेत्रातील 10 कंपन्यांचे मालक आहेत.
अझीझीच्या पत्नीचे नाव परिगुल आहे. त्यांना 07 मुले आहेत, ज्यातील अनेक जण आता त्यांचा व्यवसाय सांभाळत आहेत. ते दुबईमध्ये आलिशान जीवन जगतात. त्यांची मालमत्ता काबूलमध्ये देखील आहे.