औरंगाबाद – ग्रामीण भागातील पहिली ते सातवीच्या शाळा आज पासून सुरू करण्याची परवानगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली. यामुळे आता ग्रामीण भागातील पहिली ते बारावीचे वर्ग पूर्ण वेळ नियमित सुरू होतील अशी माहिती शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांनी दिली. शहरातील शाळा संदर्भात मात्र पुढील आठवड्यात निर्णय घेतला जाईल.
राज्यात पहिली ते बारावीच्या शाळांतील प्रत्यक्ष शिक्षण 24 जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने 20 जानेवारी रोजी जाहीर केला. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आठवी ते बारावी चे वर्ग सुरू करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत 24 जानेवारी रोजी झाला. त्यानंतर आठवड्याभरातच पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश कटनी यांनी घेतला. त्यामुळे ग्रामीण भागातील पहिली ते बारावीचा नियमित शिक्षणाचा मार्ग खुला झाला आहे.
शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती व पूर्णवेळ शाळा सुरू राहिल्याने विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे शिक्षण आता प्रत्यक्ष घेता येणार असल्याचे परीक्षांची तयारी करणे सोपे होणार आहे. विद्यार्थ्यांची संमती पत्र घ्यावे, दिलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करून पूर्णवेळ शाळेत वर्गात शिकवण्यावर शिक्षकांनी लक्ष देण्याच्या सूचनाही देशमुख यांनी दिल्या आहेत.