Karad News : कराडात महाविद्यालय परिसरात आढळला सडलेल्या मृतदेहाचा सांगाडा; घातपाताची शक्यता?

Karad Police
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील राजमाची येथील मोकाशी कॉलेजच्या परिसरात अनोळखी व्यक्तीचा सडलेल्या अवस्थेत सांगाडा आढळला आहे. कराड तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. हा सांगाडा पुरुषाचा आहे कि महिलेचा हे याबाबत माहिती अजून तरी समोर आलेली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील कराड- विटा मार्गावर असलेल्या मोकाशी कॉलेजजवळ सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. डीवायएसपी अमोल ठाकूर व कराड शहरचे पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, पीएसआय राज पवार यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. सदरील घटना म्हणजे घातपात झाला असल्याचा संशय काहींनी व्यक्त केला आहे. पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत मात्र अद्याप तरी कोणतीही ठोस माहिती हाती आलेली नाही.

दरम्यान, मोकाशी कॉलेजच्या पाठीमागील बाजूस अोढ्याजवळ सापडलेला हा सांगडा खूप दिवसापूर्वीचा आहे, त्यामुळे त्याचे पोस्टमार्टमही करता येणार नाही. मात्र, जोपर्यंत या सांगाड्याची अोळख पटत नाही, तोपर्यंत घातपात की मृत्यू याबाबत काहीही सांगता येणार नाही अशी माहिती पोलिसांनी दिली .