राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा खून केला ; राणेंनी साधला निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले असून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अपवादात्मक परिस्थिती दिसून येत नाही. त्यामुळे एसीबीसीच्या नावाखाली देण्यात आलेलं आरक्षण आम्ही रद्द करत आहोत, असं कोर्टाने म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे सरकार वर निशाणा साधला आहे.

या महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण चा नियोजित पद्धतीने खून केला आहे!!!सरकार आल्यापासून ही ठरवून केलेली हत्या आहे..कसली तयारी नाही.. फक्त नाटक आणि ढोंगीपणा..शेवटी छ. शिवाजी महाराजांनी जे शिकवून ठेवले आहे.तोंड वाजवून न्याय भेटत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा!! असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.

नक्की काय घडलं

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. सर्वोच्च न्यायालयात बुधवारी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. न्यायमूर्ती भूषण यांनी मराठा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आहेत अशी दुरुस्ती संपुष्टात आल्याचं सांगितलं. 50% ची मर्यादा ओलांडून दिलेले आरक्षण अवैध असल्याचं कोर्टाने सांगितलं.

Leave a Comment