कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेवून राज्यातील शाळा सुरू कराव्यात. कोरोनाच्या महामारीत सर्वात जास्त बाधित क्षेत्र हे शिक्षण क्षेत्र आहे. तेव्हा शाळेत सॅनिटियझेशन करणे, डिस्टन्सिंग पाळणे, मनुष्यबळ नेमने, दोन सत्रात शाळा भरवण्याची गरज आहे. परंतु त्यासाठी सरकारने शैक्षणिक वर्ष व्यवस्थित पार पडण्यासाठी सर्व शाळांना निधी उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था,महामंडळाचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांनी पत्रकार परिषदेत मागणी केली.
अशोकराव थोरात म्हणाले, आज महाराष्ट्रात कोट्यावधी विद्यार्थी पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी घरात बसून आहेत व त्यांना वेठीस धरलेले आहे. त्यांना प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिकता येत नाही. बारावी व दहावीचे निकाल लागले नाहीत, त्यांचे पुढे जाण्याचे सगळे मार्ग बंद झालेले आहेत. तेव्हा माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे, की तुम्ही शिक्षण क्षेत्राच्या बाबतीतला निर्णय ताबडतोब घ्या व तो राज्याच्या स्तरावर घ्या. यां निर्णयांमध्ये आमची अपेक्षा संस्थाचालक म्हणून ,शिक्षक म्हणून ,मुख्याध्यापक म्हणून अशी राहील की महाराष्ट्र मध्ये शाळा सुरू करायच्या असतील तर ,विद्यार्थ्यांची हित बघायचे असेल तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारने या सर्व शाळांना एक निधीचा बूस्टर डोस दिला पाहिजे.
कोरोनावर नजिकच्या भविष्यकाळात लस येईल. परंतु शैक्षणिक वर्ष सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतला तर विद्यार्थ्यांचे न भूतो न भविष्यती नुकसान होईल. शिक्षणमंत्री म्हणताय, त्याप्रमाणे कुठलाही जिल्हाधिकारी आपल्या जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा धोका पत्करणार नाही. यासाठी राज्याच्या स्तरावर तो निर्णय झाला पाहिजे .आर्थिक तरतूद केली पाहिजे .तरच हे सगळे शिक्षक ,संस्थाचालक आणि शाळा हा सगळा धोका पत्करून विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी यांच्या जीवाला धोका होणार नाही. अशा पद्धतीचे शिक्षण देऊ शकेल. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही .
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे तिसऱ्या वर्षाचे किंवा पदवीच्या परीक्षा रद्द केल्या ,यावर्षीचे शैक्षणिक वर्ष रद्द केले तर फार मोठे नुकसान होईल व त्याची फार मोठी किंमत सरकारला समाजाला मोजावी लागेल. माझी विनंती आहे, शिक्षण मंत्र्यांना, आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला की शिक्षणावरचा निर्णय ताबडतोब येत्या आठवड्याभरात तुम्ही घेऊन सर्वांना व विद्यार्थ्यांना आश्वस्त करा.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.