हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुधवारी गणेश चतुर्थीनिमित्त शेअर बाजार (Stock Market) बंद राहणार आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या हॉलिडे कॅलेंडरनुसार, 31 ऑगस्ट रोजी इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंट, इक्विटी सेगमेंट आणि सिक्युरिटीज लेंडिंग अँड बोरोइंग (SLB) सेगमेंट बंद राहतील. तर, मल्टीकमोडिटी एक्सचेंज हे फक्त सकाळच्या सत्रात (सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत) बंद राहतील. मात्र संध्याकाळच्या सत्रात (संध्याकाळी 5 ते 11.30 पर्यंत) ट्रेडिंग सुरु राहील.
त्याचबरोबर, नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज लिमिटेड (NCDEX) हे सकाळच्या सत्रात (सकाळी 9 ते संध्याकाळी 5) या वेळेत बंद राहील. मात्र सायंकाळी 5 ते 9 या वेळेत काम सुरु राहील.
शेअर बाजाराच्या 2022 मधील सुट्ट्या पहा
2022 मधील उर्वरित महिन्यांत साप्ताहिक सुट्ट्या वगळता शेअर बाजाराला (Stock Market) एकूण 4 दिवस सुट्ट्या असतील. या 4 दिवशी शेअर बाजारात कोणतेही ट्रेडिंग केले जाणार नाहीत. यानंतर, शेअर बाजाराची पुढील सुट्टी ऑक्टोबर महिन्यात असेल. हे लक्षात घ्या कि, सप्टेंबरमध्ये बाजाराला सुट्टी नसेल. त्याचबरोबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये एकूण चार प्रसंगी शेअर बाजार (Stock Market) बंद असतील. आता 5 ऑक्टोबर (बुधवार) रोजी दसरा, 24 ऑक्टोबर (सोमवार) रोजी दिवाळी आणि 26 ऑक्टोबर (बुधवार) दिवाळी बली प्रतिपदा असल्याने बंद राहणार आहेत. तसेच 8 नोव्हेंबरला (मंगळवार) गुरुनानक जयंतीनिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहेत. 2022 या वर्षामध्ये शेअर बाजाराला एकूण 13 सुट्ट्या घोषित करण्यात आल्या होत्या.
सेन्सेक्स 1564 अंकांच्या वाढीने बंद
जवळपास 6 महिन्यांनंतर आज सेन्सेक्स 1500 हून जास्त अंकांच्या वाढीने बंद झाला. आज सेन्सेक्स 1564 अंकांनी (2.70%) वाढून 59,527 वर बंद तर निफ्टी 446 अंकांच्या (2.58%) वाढीने 17759.30 वर बंद झाला. आज शेअर बाजारातील (Stock Market) गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 5.71 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
या वाढीमागील कारण जाणून घ्या
इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती खूपच चांगली असल्याचे तज्ज्ञांनी म्हंटले आहे. आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बालसुब्रमण्यम यांच्या मते, भारतीय अर्थव्यवस्थेतील सुधारणांवर लक्ष केंद्रित केले आहे. टॅक्स कलेक्शन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत गुंतवणूक सुधारणे ही अतिशय सकारात्मक पावले असल्याचे ते म्हणाले. याशिवाय या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील GDP डेटाकडूनही लोकांना खूप अपेक्षा आहेत आणि हीच भावना आज बाजारात दिसून आली आहे. Stock Market
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/static/markets/marketinfo/listholi.aspx
हे पण वाचा :
EPFO च्या सदस्यांना आता डिजीलॉकरद्वारे डाउनलोड करता येतील ‘ही’ महत्त्वाची कागदपत्रे !!!
PM Kisan चा 12 वा हप्ता हवा असेल तर उद्यापर्यंत करावी लागेल eKYC, जाणून घ्या संपूर्ण पद्धत
बँकेची overdraft facility काय आहे ??? त्याचा फायदा कसा घ्यावा हे समजून घ्या !!!
SBI देत आहे 6,000 रुपये जिंकण्याची संधी !!! या मेसेजमागील सत्य जाणून घ्या
सणासुदीच्या काळात Personal Loan घेणार असाल तर विविध बँकांचे व्याजदर तपासा !!!