धक्कादायक !! MBBS चे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबाद येथील शासकिय महाविद्यालयात एम.बी.बी.एस चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थाने आत्महत्या केल्याचे समजत आहे. यश नरसिंगराव गंगापूरकर असे आत्महत्या करणाऱ्या 25 वर्षीय विद्यार्थाचे नाव आहे. औरंगाबादेतील शासकीय वैधकीय महाविद्यालय व रुग्णालयात तो द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होता. विष प्राशन करून यशने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश गंगापुरकर हा गेल्या दोन वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस चे शिक्षण घेत होता. गेल्या काही दिवसांपासून तो बेगमपुरा येथील ब्राम्हण गल्ली येथे त्याच्या आई सोबत खोली घेऊन राहत होता. त्याने २५ डिसेंबर ला घाटी रुग्णालयात एका रुग्णांवर उपचार करून तो घरी गेला होता. दरम्यान दुसऱ्या दिवशी त्याने राहत्या घरी दुपारी ११ च्या सुमारास औषध प्राशन केले. हा प्रकार घरच्यांच्या लक्षात येताच त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर तीन दिवस उपचार सुरू होते. दरम्यान शुक्रवारी रात्रीच्या सुमारास त्याच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कारण अद्याप समजू शकले नाही…. 

यशचा औषध प्राशन करून मृत्यू झाल्या प्रकरणी पोलिसांनी त्याच्या मित्रासह मोबाईल मध्ये झालेल्या संभाषणाची कसून तपासणी केली. तसेच त्याच्या महाविद्यालयतील शिक्षकांकडून तणावात होता का याची माहिती घेतली. मात्र आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे तपास अधिकारी राजकुमार जाधव यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’