हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगभरावर ओढावलेल्या कोरोना संकटामुळे यावर्षी ऑक्टोबर – नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात खेळवली जाणारी टी-20 विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या आयसीसीच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान आता बीसीसीआयचा आयपीएल खेळवण्याचा मार्ग टी-20 विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलल्यामुळे मोकळा झाला आहे. बीसीसीआय सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल खेळवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. आता बीसीसीआयकडून लवकरच आयपीएलबाबतची अधिकृत घोषणाही करण्यात येण्याची दाट शक्यता आहे.
आता आयसीसीकडून तीन मोठ्या स्पर्धांचे पुढील तीन वर्षांमध्ये आयोजन करण्यात येणार आहे. 2021 व 2022 साली टी-20 विश्वचषक स्पर्धेचे तर 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबमध्येच खेळवण्यात येणार आहेत. 2021 साली होणारा टी-20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना 14 नोव्हेंबरला, तर 2022 टी-20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना 13 नोव्हेंबरला आणि 2023 सालामधील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचेचा अंतिम सामना 26 नोव्हेंबरला खेळवण्यात येईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.