सोलापूर | सोलापुरात शहरात आज सकाळी एक मासे घेवून जाणारा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे मासे गोळा करण्यासाठी सकाळ- सकाळी लोकांची मोठी झुंबड उडालेली पहायला मिळाली. सोलापूर – विजापूर रोडवरील संभाजी महाराज तलावाजवळ मासे वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला.
विजापूरहून सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कठड्याला जोरदार धडक दिली. ट्रक पलटी होताच त्यातील जिवंत मासे तलावाच्या सुकत चाललेल्या पाण्यात पडले. या घटनेची माहिती शहरात व परिसरात वाऱ्याच्या वेगाने पसरली. यामुळे हे मासे पकडण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. लोकांनी पिशव्या भरून मासे पकडले.
आज सकाळी विजापूर रोड पुलावर माशांचा ट्रक पलटी ;मासे घेण्यासाठी नागरिकांची झुंबड pic.twitter.com/iVjpGsg0S9
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) May 8, 2021
मासे पकडण्यासाठी ऐन कोरोनाच्या उद्रेकात एवढ्या मोठ्या संख्येने तलावाच्या चिखलात उतरण्यासही हे नागरिक मागे पुढे पाहत नव्हते. मासे गोळा करणाऱ्यांची झुंबड पाहण्यासाठी तलावाबाजुला असलेल्या पुलावरून पाहण्यासाठी गर्दी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून मासे घेऊन जाणाऱ्या लोकांना पोलिस हुसकावून लावीत आहेत.