Wednesday, October 5, 2022

Buy now

पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटखाली दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा शहरातील पोवई नाका येथे नव्याने बांधलेल्या ग्रेड सेपरेटर खाली दोन दुचाकीच्यात भीषण अपघात झाला आहे. उलट दिशेने चुकीच्या मार्गाने येणाऱ्या दुचाकीची समोर आलेल्या दुसऱ्या दुचाकीला समोरासमोर धडक झाली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटर खाली समोरासमोर दुचाकीची धडक झाली. दुचाकी वेगात असल्याने धडक जोरदार बसली आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी लोकांनी गर्दी केली होती. तातडीने जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ग्रेड सेपरेटरमध्ये चुकीच्या दिशेने आलेल्या दुचाकीमुळे अपघात झाला. अशा प्रकारे चुकीच्या पध्दतीने दुचाकी ग्रेड सेपरेटमध्ये नेवू नये, असे आवाहन पोलिसांनी वाहनचालकांना केले आहे. अपघातात जखमींमध्ये दोन परंप्रातींयाचा समावेश आहे. अधिक माहिती पोलिस घेत आहेत.