सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे,
मिरज तालुक्यातील बेळंकी व भोसे येथे कॅनॉलच्या पाण्यामध्ये बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बेळंकी कॅनॉलमध्ये सूर्या जाधव हा पोहण्यासाठी गेला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागला. यावेळी त्याला वाचविण्यासाठी कॅनॉलमध्ये उतरलेले त्याचे वडील राजाराम जाधव हे देखील पाण्यात पडल्याने या दोघा पिता पुत्राचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला.
तर दुसऱ्या लहान मुलास क्रशर मधील कामगारांनी एक किलोमीटर अंतरावर पाठलाग करीत थरारक रित्या वाचविले. दरम्यान काल शनिवारी तालुक्यातील भोसे येथील कॅनॉलध्ये बुडून तुकाराम बन्ने यांचाही बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
बेळंकी येथील निवृत्त माजी सैनिक राजाराम जाधव हे आपल्या दोन मुलासह बेळंकी येथील मुख्य कालव्यात पोहण्याच्या हेतूने चार वाजता आले होते. त्यांच्यासोबत एक पाहुणा म्हणून आलेला अंकली येथील मुलगा मनोज वडर हा सात वर्षाचा मुलगाही सोबत होता. यावेळी दोन मुले आणि वडील मुख्य कालव्यात पायऱ्या असलेल्या ठिकाणी पोहण्यासाठी उतरले. परिणामी या वाहत्या पाण्यात दोन्ही मुले आणि वडील यांना पोहता येईना. मुले प्रवाहाने ओढत जाऊ लागले. वडील वाचविण्याचा प्रयत्न करीत होते. त्याचवेळी अंशात्मक एका हाताने दिव्यांग असलेल्या श्रेयसने वडिलांना पकडले. पण प्रवाहाची गती त्यांना पुढे ढकलत होती. त्यामुळे आरडाओरडा वडिलांनी सुरू केला. हा प्रकार त्याचवेळी कालव्याच्या काठावर असणाऱ्या पाहुण्या मनोजने एकच आक्रोश सुरू केला. तब्बल दीड किलोमीटर अंतर सात वर्षांचा मनोज प्रवाहसोबत पळतच होता. याच दरम्यान कालव्यालगत असणाऱ्या एका क्रशर मधील कामगार सुट्टी करून काळव्याजवळून जात होते. त्यांनी आरडाओरडा ऐकून एक लांब काठी घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एका लागत आलेल्या अथर्व या मुलास त्यांना वाचवण्यात काठीमुळे यश मिळाले. थोड्या अंतरावर वडिलांचे शरीर बाहेर काढले पण ते त्यावेळी मयत झाले होते. तर दुसरा मुलगा श्रेयस हा तसाच वाहत तीन किलोमीटर अंतरावर गेला होता.
डोंगरवाडी उपसा सिंचन नजीक त्या मृतदेहाचा पाठलाग काहींनी केला. जवळ मळा असणाऱ्या दोन साहसी तरुणांनी वाहत्या कालव्यात डोके पाहून उडी घेतली. पण श्रेयस त्यावेळी मयत झाला होता. दरम्यान वाचलेल्या अथर्वला बेळंकी येथील स्थानिकांनी खासगी दवाखान्यात दाखल करून उपचार केले. त्याची प्रकृती स्थिर असून त्याला सायंकाळी घरी सोडले.