हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस या कार्यक्रमाला प्रेक्षकांची चांगलीच लोकप्रियता आहे. या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून घेतले आहेत. मात्र यंदाचा आगामी सिझन हा इतर सिझनपेक्षा खूपच वेगळा आणि हटके असणार आहे. यंदाच्या सिझनमध्ये म्हणे केवळ कपल असणार आहेत. या कार्यक्रमाच्या १४ व्या सिझनमध्ये अभिनव शुक्ला आणि रुबीना दिलैक तर अली गोनी आणि जस्मिन भसीन असे दोन कपल आपल्याला पाहायला मिळाले होते. सामान्य लोकांनाच नव्हे तर सलमानला देखील ही गोष्ट आवडली होती. त्यामुळे सलमानने या कपल स्पेशलसाठी होकार दिला असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.
https://www.instagram.com/p/CPYBLFBHyEs/?utm_source=ig_web_copy_link
बिग बॉस या कार्यक्रमाचा आगामी सिझन ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. या कार्यक्रमात कोणकोण कपल सहभाग घेऊ शकतात याचा तूर्तास तरी कार्यक्रमाच्या टीमकडून शोध सुरु आहे. इंडस्ट्रीतील नवविवाहित कपलसोबत सध्या चर्चा सुरू असल्याचे म्हटले जात आहे. तसेच याशिवाय ब्रेकअप झालेले कपल देखील या कार्यक्रमात दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.
https://www.instagram.com/p/CM7Oe0vB8t_/?utm_source=ig_web_copy_link
हा शो सर्वात विवादास्पद शो असला तरीही नेहमीच प्रेक्षकांच्या लोकप्रियतेचा भाग राहिला आहे. आता या येत्या सिजनमध्ये प्रेक्षकांना काय आणि किती पाहायला मिळेल याचा अंदाज कुणीच लावू शकत नाही. या शोबाबत अनेक विविध चर्चा रंगल्या आहेत. मात्र यातील मुख्य चर्चा शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या नावांची आहे.
https://www.instagram.com/p/CPiJFQeBfUO/?utm_source=ig_web_copy_link
इंडिया डॉट कॉमच्या वृत्तानुसार, अनुषा दांडेकर, तारक मेहता..मधील दयाबेन अर्थात दिशा वाखानी, कसौटी जिंदगी की २ फेम पार्थ या कलाकारांना शोच्या निर्मात्यांनी संपर्क साधला आहे. तर नागीन ५ फेम सुरभी चंदना, कृष्णा अभिषेक, ये रिश्ता क्या कहलाता है फेम मोहसीन खान, नागीन ४ फेम निया शर्मा यांच्या नावांबाबत मोठी चर्चा आहे.
https://www.instagram.com/p/CPdbFhsBxWs/?utm_source=ig_web_copy_link
या अहवालात पुढे असे नमूद केले आहे की, बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती जिचा सध्या दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाशी खोल संबंध आहे, ती देखील या शोमध्ये दिसणार आहे. दरम्यान, बिग बॉस १४ मधील गाजलेला स्पर्धक राहुल वैद्य याची गर्लफ्रेंड दिशा परमार देखील बिग बॉस १५ च्या घरात दिसू शकते.
https://www.instagram.com/p/CPVnx_rrxnc/?utm_source=ig_web_copy_link
तर स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांनाही निर्मात्यांनी संपर्क साधला आहे आणि या जोडप्याने त्यात रस दर्शविला आहे.