रहिमतपूर येथील राजेबागसवार (बाबा) राजवेली यांचा ऊरुस संपन्न

Rahimatpur News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथील सुन्नतवस जमाआतचे मौलाना जिब्रील यांची जनसमुदायासह फातेहखानी व सलाम व दुआचा कार्यक्रम हजरत पीर राजेबागसवार (बाबा) राजवेली यांचे दरगाहमध्ये संपन्न झाला. सर्वधर्म समभावाने अनेक हिंदू-मुस्लीम धर्मीय या कार्यक्रमास उपस्थित होते.

रहिमतपूर येथे दरवर्षी उर्सचा कार्यक्रम साजरा केला जातो. याही वर्षी मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राजेबागसवार राजवेली बाबांचा झेंडा दरवर्षीप्रमाणे रहिमतपूरचे पोलीस पाटील दिपक नाईक यांच्या हस्ते काढण्यात आला.

या दोन्ही कार्यक्रमासाठी रवि वाघ, चाँदखान पठाण, शकील आतार, आबु शेख, आयुब बागवान, रहिम मुल्ला, डॉ. अजमल आतार, नबीलाल मुलाणी यासह भक्त उपस्थित होते.