भारतीय क्षेत्रात चोरून प्रवेशानंतर अमेरिकेने हे सांगितले कारण; भारताने व्यक्त केली चिंता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : अमेरिकी नौदलाचे एक जहाज भारतीय समुद्री भागातून गेले होते, त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार समुद्रावर येण्याजण्याचे स्वातंत्र्य आहे. म्हणून भारताकडून परवानगी घेण्यात आली नाही, असे अमेरिकेच्या नौदलाने निवेदनात म्हटले आहे. भारताने आपल्या विशेष आर्थिक क्षेत्र(EEZ) मधून अमेरिकेचे जॉन पॉल हे जहाज जाण्यावर कडक नाराजगी व्यक्त केल्यानंतर पेंटागनने ही सफाई दिली आहे.

अमेरिकेचे संरक्षण सचिव पेंटागॉनचे प्रेस सचिव जॉन एफ. कर्बी म्हणाले की, यूएसएसचे जॉन पॉल जोन्स नुकतेच मालदीवमधून गेले होते. येथे कोणतीही युद्धाभ्यास चालविली गेला नाही. अमेरिकन जहाजाची पूर्व परवानगी न घेता भारतीय ईईझेड भागातून जाण्यासाठी नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावास आणि अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन या दोन्ही ठिकाणी भारताने तक्रार दिली होती. ही तक्रार भारताने डिप्लोम्याटिक माध्यमांमार्फत केली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले होते की, यूएसएसचे जॉन पॉल जोन्स पर्शियन आखातीपासून मलाक्का सामुद्रधुनीपर्यंत सतत देखरेख ठेवत आहेत.

आमच्या आर्थिक क्षेत्रामधून जानाऱ्या या जहाजाचा मार्ग मुत्सद्दी मार्गाद्वारे आम्ही अमेरिकन सरकारकडे नोंदविला आहे. जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारताने या संदर्भात जुन्या संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनाचा उल्लेखही केला आहे. या अधिवेशनाला युनायटेड नेशन्स कॉन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ सी (यूएनसीएलओएस) म्हणतात, त्यानुसार दुसर्‍या देशातील एखादे वाहन दुसर्‍या देशाच्या हद्दीत सागरी झोनमधून जात असेल तर प्रथम त्या देशाची परवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु अमेरिका या प्रकरणावर वेगळी बोंब ठोकत आहे. याबाबत भारताने आक्षेप नोंदविला होता.

You might also like