खुद्द प्रशासकांनीच नागरीकांच्या घरी जाऊन दिली लस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेण्यास नागरिक टाळाटाळ करीत असल्याचे पाहून काल मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी स्वतः जटवाडा रोड वरील सारा सिद्धी भागात जाऊन नागरिकांना दुसरा डोस दिला.

शहरात शंभर टक्के लसीकरण झालेले नाही. 72 हजार नागरिक दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे सकाळी अचानक जटवाडा रोड वरील सारा सिद्धी वसाहतीत प्रशासक दाखल झाले. प्रशासकांनी नागरिकांना प्रेमाने समजावून सांगूत लसीचा दुसरा डोस दिला.

महापालिकेला कोरोना लसीकरणाचे 11 लाख 76 हजार 999 एवढे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आत्तापर्यंत दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची टक्केवारी 81.96 एवढी आहे. पहिला डोस घेतलेल्यांची टक्केवारी 81.42 तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची टक्केवारी 47.20 असल्याचे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.

Leave a Comment