हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अयोध्येतील रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला अवघे काही दिवस राहिले आहेत. त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. खास म्हणजे, ज्या राम मंदिराच्या उभारणीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत, ते मंदिर नेमके कसे दिसेल? हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. अशातच ज्या मंदिराच्या गर्भगृहामध्ये रामलल्लाची मूर्ती बसवण्यात येणार आहे, त्याचा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून गर्भगृहाचे सौंदर्य स्पष्टपणे दिसत आहे.
गर्भगृहाचे रूप कसे आहे?
आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो की, प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीसाठी एक भव्य असा उंच मंच तयार करण्यात आला आहे. संपूर्ण गर्भगृह हे शुभ्र अशा संगमरवरी दगडाचा वापर करून बनवण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर, संगमरवरावर रेखीव आणि भव्य नक्षीकाम ही करण्यात आले आहे. हे नक्षीकाम इतके उत्कृष्ट आहे की, या गर्भगृहाला पाहिल्यानंतर सर्वजणच थक्क होतील. तसेच या गर्भगृहाचे भरभरून कौतुक करतील.
https://x.com/pramodsingh_07/status/1747569694331269484?s=20
सध्या सोशल मीडियावर देखील राम मंदिराच्या गर्भगृहाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या गर्भगृहाच्या नक्षीदार कामावरूनच अंदाज बांधला जात आहे की संपूर्ण राम मंदिर कसे दिसत असेल. मात्र हे राम मंदिर भाविकांसाठी प्राण प्रतिष्ठापना सोहळा पार पडल्यानंतर खुले होणार आहे. राम भक्तांना या सोहळ्यानंतर रामलल्लाचे प्रत्यक्षात दर्शन घेता येईल.
दरम्यान, माध्यमांशी बोलताना राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले आहे की, प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी काही आवश्यक विधी करावे लागणार आहेत. त्यानंतर 22 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची पूजा करण्यात येणार आहे. आता अनुष्ठान सुरू झाले आहे. यासंबंधित सर्व विधी 22 जानेवारीपर्यंत सुरू राहतील.