हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणेकरांसाठी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. गुरुवारी म्हणजेच २१ ऑक्टोबरला संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. स्थापत्य विषयक दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने ही माहिती दिली आहे. तसेच शुक्रवारी (दि. 22) शहरात उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पर्वती जलकेंद्र पंपींग, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव जलकेंद्र, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र आणि होळकर पंपिंग स्टेशन, चिखली रावेत पंपींग येथील विद्युत, पंपींग विषयक, स्थापत्य विषयक देखभाल व दुरुस्तीचे कामे केली जाणार आहेत. यामुळे येत्या गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
या भागात पाणीपुरवठा बंद राहणार-
वडगाव जलकेंद्र (Vadgaon Water Station) : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ, कोंढवा बुद्रुक
चतुःश्रृंगी, एस.एन.डी.टी वारजे जलकेंद्र : पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतुःश्रृंगी परिसर, बावधन, बाणेर, चांदणी चौक, महात्मा सोसायटी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, सूस, सुतारवाडी, भूगाव रस्ता, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज, महात्मा सोसायटी, गुरुगणेशनगर
लष्कर जलकेंद्र : लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, येरवडा परिसर, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, मुंढवा, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, गोंधळेनगर, सातववाडी