सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचे प्रमाण हळू हळू कमी होऊ लागले होते. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. रविवारी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार चोवीस तासात तब्बल 461 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी माहिती दिली. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरू लागली आहे.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 9 हजार 547 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 86 हजार 532 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 73 हजार 293 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 4 हजार 202 बाधितांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दिवसभरात 16 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासात 6 हजार 112 जणांचे नमुने घेण्यात आले.
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा पाॅझिटीव्हीटी दर कमी झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी नियमात शिथिलता दिलेली आहे. त्यामुळे सोमवारपासून जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पुन्हा सुरु झालेली आहेत.