लग्नाचे आमिष दाखवून विधवेवर केला अत्याचार

औरंगाबाद | ‘मला तु जीवन दान दिले, मला तुझ्या सोबत लग्न करायचे आहे’ असे म्हणून एका विधवा महिलेवर युवकाने अत्याचार केल्याची आणि तिच्याकडून तीन लाख रुपये घेतल्याची घटना रांजणगाव शेणपुंजी परिसरात दत्तनगर येथे घडली आहे. श्रीकांत विक्रम इंगोले (रा. सावरगाव, हिंगोली) असे आरोपीचे नाव आहे.

पीडित महिलेच्या पतीचे 2013 साली निधन झाले होते. सध्या ती दत्तनगर येथे मेस चालून स्वतःचा उदरनिर्वाह करते. 2015 चाली तिची ओळख श्रीकांत सोबत झाली होती. श्रीकांतने मला आई वडील नाही असे सांगितले होते. त्याचे हर्नियाचे ऑपरेशन झाले तेव्हा पीडितेने दवाखान्याचा पूर्ण खर्च केला होता. तू मला नवीन जीवन दिली आहे मला तू फार आवडतेस मला तुझ्या सोबत लग्न करायचे आहे. असे बोलून त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.

पीडितेला विश्वासात घेऊन मला यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी दिल्लीला जायचे आहे. असे सांगत त्याने तिच्याकडून तीन लाख रुपये घेतले. आपल्यावर अत्याचार करुन आपली फसवणूक केल्याचा प्रकार 2015 ते 22 मार्च 2020 या काळात घडला. असल्याचे तिने तक्रारीत सांगितले याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रशांत गंभीरराव हे करीत आहेत.

You might also like