तारळी धरण क्षेत्र : गेल्या 24 तासात 233 मि. मी पाऊस, आज 8 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पाटण तालुक्यातील तारळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने गेल्या 24 तासात आज सकाळी आठ वाजेपर्यंत 233.00 मि. मी. पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत 3. 90 मी. ने वाढ झाली असुन सरासरी पाणी आवक 7 हजार 771 क्युसेस आहे. तरी मंजूर जलाशय परिचलन आराखड्याप्रमाणे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दि. 22 गुरूवारी सायंकाळी 5 वाजता धरणातून 8 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सोडण्यात येणार आहे.

जिल्ह्यात काल दिवसभरात सरासरी 76.2 मि.मी. पाऊस झाला असून महाबळेश्वर, जावळी, पाटण व वाई तालुक्यात 100 मि. मि पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जिल्ह्यात काल दिवसभरापासून आज गुरुवार सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी एकूण 76.2 मि.मी.पाऊस पडला असून आतापर्यंत सरासरी 196.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.

सातारा- 100.6(192.6) मि. मी., जावळी- 140.2(295) मि.मी., पाटण-132.9 (290.4) मि.मी., कराड-81.4(156.6) मि.मी., कोरेगाव-50.2 (134.9) मि.मी., खटाव-37.3 (83.3) मि.मी., माण- 8.1 (126.4) मि.मी., फलटण- 4.7 (70.1) मि.मी., खंडाळा- 23.7 (68.7) मि.मी., वाई-112.4 (232. मि.मी., महाबळेश्वर-198.3 (848.4) मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

Leave a Comment