सॅनिटायझरच्या बाटलीने पेट घेतल्याने तरुणाचा होरपळून मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | सॅनिटायझर च्या बाटली शेजारी पेटती मेणबत्ती ठेवुन झोपी गेलेल्या तरुणाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना वाळूज परिसरात उघडकीस आली आहे. या आगीत तरुण गंभीररित्या भाजला गेला. राम दिघे (वय 28) असे या तरुणाचे नाव आहे.

राम त्याची पत्नी, आणि आई वडीलांसोबत भारत नगरात राहत असून तो वाळूज एमआयडीसीतील कंपनीत काम करत होता. काही दिवसांपूर्वी राम दिघे यांची पत्नी प्रसुतीसाठी माहेरी गेली होती. मंगळवारी सायंकाळी राम रूम मध्ये झोपण्यासाठी गेला होता. सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास राम झोपलेल्या खोलीतून धूर बाहेर येत असल्याचे शेजारी राहत असलेले किरण खांदेभरात आणि गणेश सोळंके यांनी घराच्या वरच्या रूमवर जाऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण दरवाजा आतून बंद असल्याने तसेच धुराचे लोळ हे खिडकीतून बाहेर येत असल्याने शेजारच्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला.

यावेळी राम हा गादीवर भाजलेल्या अवस्थेत पडलेला होता. हे शेजारी आणि त्याच्या आई वडिलांना दिसून आले. त्यानंतर शेजारच्यांनी घरातील आग विझवून रामला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहे. कॉ. वसंत जिवडे करत आहेत.

Leave a Comment