पोलिसांनी दिलेली 300 उठाबशांची शिक्षा पूर्ण करताना तरुणाचा मृत्यू : संचारबंदी नियमांचं उल्लंघन पडलं महागात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : जगभरातील विविध देशांत पुन्हा एकदा कोरोनाचा चांगलाच उद्रेक झालेला पहायला मिळतोय. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विविध देशांतील सरकारने कठोर निर्बंध लावत कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीउपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. फिलिपीन्समध्ये सुद्धा सरकारने संचारबंदी लागू केली आहे. तसेच संचारबंदीच्या नियमाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येत आहे. अशाच प्रकारे एका व्यक्तीने संचारबंदीचं उल्लंघन केल्याने त्याला अशी काही शिक्षा देण्यात आली ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 28 वर्षीय डॅरेन नावाचा तरुण फिलिपिन्समधील मनिला येथील कॅवेट प्रांतातील एका दुकानात गुरुवारी पाणी विकत घेण्यासाठी गेला. सायंकाळी सहा वाजता तो पाणी घेण्यासाठी गेला होता. संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने स्थानिक पोलिसांनी त्याला रोखले. डॅरेनचे नातेवाईक अॅड्रियन यांनी फेसबूकवर सांगितले की, डॅरेन आणि इतर नागरिकांना संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने पकडले आणि त्यांना शिक्षा म्हमून 100 स्क्वॅट (squat) करण्यास सांगितले. डॅरेनचे नातेवाईक अॅड्रियन यांच्या मते, या सर्वांना स्क्वॅट एकसलग करण्यास सांगितले होते मात्र, तसे न करता आल्याने पोलिसांनी त्यांना पुन्हा-पुन्हा स्क्वॅट करण्यास सांगितले. डॅरेन आणि इतरांनी 300 स्क्वॅट्स केले.

शुक्रवारी सकाळी परत आल्यावर डॅरेन याला प्रचंड वेदना होत होत्या. जेव्हा सकाळी आठच्या सुमारास तो परत आला तेव्हा त्याला एका व्यक्तीने घरी येण्यास मदत केली. मी त्याला विचारले की, तुला मारहाण झाली का? तर तो हसला. पण त्याला प्रचंड वेदना होत असल्याचं स्पष्ट दिसत होते. त्याचा चेहरा काळा पडला होता आणि हार्टबीट्स थांबले होते.

You might also like