काळजाचा ठोका चुकविणारी घटना; 20 फुटाच्या चेंबरमध्ये पडलेला तरूण 25 सेकंदात निघाला दुसऱ्या चेंबरमधून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : गेल्या आठवडाभरापासून शहरासह जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत आहे. यामध्ये नदी-नाले भरभरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पाणी देखील साचले आहे. अशात भवानी नगर परिसरात एक तरुण पावसात भरलेल्या चेंबरमध्ये अडकला आणि दुसऱ्या चेंबर मधून बाहेर निघाला.

याबद्दल सविस्तर वृत्त असे की, मोरेश सुळ (वय 18) हा तरुण जय भवानी नगरातील परिसरात राहतो. काल रात्री परिसरात जोरदार पाऊस आल्याने मोरेश हा मुसळधार पावसात तुडुंब भरलेल्या चेंबरमध्ये पडला. त्याच नशीब बलवत्तर म्हणून दुसऱ्या चेंबर मधून बाहेर तो बाहेर निघाला आणि अनर्थ टळला.

मुसळधार पावसामध्ये चेंबरला नदीच रूप आले होते.हा तरूण एका चेंबरमध्ये पडून 20 फुटवरील दुसऱ्या चेंबर मधून बाहेर निघाला. वाहत्या पाण्यामध्ये चालताना हा सगळा प्रकार घडला. अवघ्या 25 सेकंदात काळजाचा ठोका चुकवणारी घडली.

पहा संपूर्ण व्हिडिओ

Leave a Comment