शहरातील बजरंग चौकात थरार ! अवघ्या तीन सेकंदात तरुणाचा चाकूने भोसकून खून

Murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – दारू पिण्या वरून झालेल्या वादातून अवघ्या तीन सेकंदात बजरंग चौकातील विश्वास वाईन शॉपी च्या काउंटर वरच एकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना काल रात्री सव्वानऊ वाजेच्या दरम्यान घडली खून केल्यानंतर आरोपी पळून गेल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सिद्धार्थ रंगनाथ हिवराळे असं हत्या झालेल्या 35 वर्षीय तरुणाचे नाव आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, बजरंग चौकात सिद्धार्थ दारु विकत घेत असताना विशाल आगळे याने धावत येऊन त्याच्या पोटात जोराने चाकू मारला आणि विशालने तेथून पळ काढला असल्याची माहिती सिडको पोलिसांनी दिली. अवघ्या तीन सेकंदाची हि घटना वाईन शॉप मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेत त्या व्यक्तीला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून घाटी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनास्थळी डीसीपी दीपक दीपक गीऱ्हे, एसीपी निशिकांत भुजबळ, पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी भेट दिली. आरोपीच्या शोध गुन्हे शाखा आणि इतर डीबी पथक घेत आहेत.