तरुणाचा मृतदेह आढळला विहिरीत; मृत्यूचे गूढ कायम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी परिसरातील येसगाव शिवारातील विहिरीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, तरुणाने विहीरीत उडी मारुन आत्महत्या का केली, का हा घातपाताचा प्रकार आहे. याबाबत अधिकृत माहिती रात्री उशिरापर्यंत कळू शकली नाही. विजय भीमराव खरात वय (29) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मंगळवारी सकाळी येसगाव शिवारातील एका विहिरीत त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. असता याबाबतची माहिती विजय चा भाऊ भिकन भीमराव खरात याला देण्यात आली.सोमवारी रात्री विजय हा घरातून बेपत्ता झाला होता. त्यानंतर या घटनेची माहिती समजताच बाजार सावंगी पोलीस चौकीचे मुख्य जमादार नवनाथ कोल्हे, जमादार योगेश नाडे, संतोष पुंड यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीतून बाहेर काढून तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला.

मंगळवारी सकाळी पंचनामा झाल्यानंतर बाजार सावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुपे यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत तरुण विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली, की हा घातपाताचा प्रकार आहे याबाबत अधिकृत माहिती अजून कळू शकली नाही. याबाबत खुलताबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ कोल्हे करत आहेत.

Leave a Comment