हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कामापासून प्रेरित होऊन सोलापुरातल्या ऐका तरुणाने चक्क सायकलवर प्रवास करत दिल्ली गाठली आहे. निलेश सांगेपांग असे या तरुणाचे नाव आहे. निलेश आम आदमी पक्षाच्या कार्यपासून प्रभावित झाला होता.
त्यामुळे तब्बल 1600 किलोमीटरचा प्रवास सायकलवर पूर्ण करत त्याने अखेर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. विशेष म्हणजे सोलापूरची ओळख असलेली चादर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा त्याने अरविंद केजरीवाल यांना भेट दिली.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील आपल्या तरुण फॅनचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. तसेच आम आदमी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून देखील निलेश बद्दल ट्विट करण्यात आले आहे. सोलापूरच्या या तरुणाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. या तरुणाच अनेक स्तरातून कौतुक केलं जातं आहे.