वडिलांना सोडून परत येत असताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – आमगाव-गोंदिया महामार्गवर एक भीषण अपघात घडला आहे. यामध्ये ट्रक आणि बाईक यांच्यात झालेल्या अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. दिनेश चंद्रप्रकाश पहिरे असे या मृत तरुणाचे नाव आहे. तो गोंदियातील शास्त्री वॉर्डातील रहिवाशी होता.

आमगाव गोंदिया महामार्गावरून एमएच 25 एजे 2644 हा ट्रक आमगावकडून गोंदियाच्या दिशेने जात होता. यावेळी या ट्रकच्या पाठीमागून एमएच 35 यु 2552 हि बाईक येत होती. यादरम्यान मृत तरुण हा ट्रक चालकाला ओव्हरटेक करण्याचा नादात खाली पडला. आणि त्या ट्रकच्या मागच्या चाकाखाली आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

यानंतर हा ट्रकचालक आपला ट्रक जाग्यावरच सोडून घटनास्थळावरून फरार झाला आहे. मृत दिनेश हा आपल्या वडिलांना आमगाव येथे सोडून परत येत असताना हा अपघात घडला. या अपघातात ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने दिनेशच्या शरीराच्या अक्षरशः चिंधळ्या उडाल्या. त्याच्या शरीराचे तुकडे झाले. पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

Leave a Comment