सांगली । राज्यातील काँग्रेस नेते केवळ सत्तेसाठी महा विकास आघाडीमध्ये सामील झाले आहेत मात्र पक्ष श्रेष्ठींच्या नाराजीमुळे काँग्रेस सत्तेतून बाहेर पडेल असे संकेत ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी दिले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे पटत नाही महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे वेगळी दिशा घेतात पृथ्वीराज चव्हाण कराडमध्ये बसतात आत्तापर्यंत शरद पवार काँग्रेस चालवत होते. तसे पाहिले तर पवारांना काँग्रेसने आंदण दिली होती.
येत्या काही महिन्यात अनेक राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब या राज्यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेश, गोवा आणि उत्तराखंडमध्ये सत्ता टिकवणे जरुरीचे आहे. उत्तर प्रदेश हे सर्वात मोठे राज्य असल्याने तेथील सत्ता महत्त्वाची ठरणारी असेल. उत्तर प्रदेशच्या निकालानंतर 2024 पर्यंत देशाची दिशा आणि दशा तय होईल. त्यासोबत महाराष्ट्राचे भवितव्य निश्चित होईल. बहुतांशी राज्यात भाजप सत्तेत आल्यास मार्च 2022 नंतर महाराष्ट्रात सत्ता बदल होण्याचे संकेत आहेत.
महाराष्ट्रातील विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक लांबली गेल्यामुळे सोनिया गांधी नाराज झाल्या. विधानसभेत काँग्रेसचा अध्यक्ष होतो म्हणून आवाजी मतदानाने निवड का? असा प्रश्न निर्माण झाला. सरकारमध्ये मेजॉरिटी नसली तर अध्यक्ष कसा निवडून आणायचा. आणि मेजॉरिटी नसली तर सरकारमध्ये काय थांबायचे असा सवाल वरिष्टांनी उपस्थित केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांपासून सर्व नेत्यांचा हाय कमांडपुढे कस लागला असल्याचे ज्येष्ठ पत्रकार वानखेडे यांनी स्पष्ट केले.