हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पश्चिम बंगालमधील विधानसभेची निवडणूक चांगलीच चर्चेत आहे. निवडणुकीनंतर टीएमसीला बहुमताची कमतरता असली तरी पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एका न्युज एजन्सीला दिलेल्या मुलाखतीत बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी बोलत होते. चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे कि ममता बॅनर्जींनी मागच्या दहा वर्षात काँग्रेसला बंगालमध्ये ठरवून उद्धवस्त केलं. आमचा पक्ष सत्ते येण्यासाठी त्यांची मदत करत होता. मात्र, आता त्या इतक्या घाबरल्या आहेत की आता काँग्रेसची मदत मागत आहेत. याच काँग्रेसला राजकीय दृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. तो त्यांनी करू नये अशा शब्दात अधीर रंजन चौधरी यांनी ममता यांना सुनावलं आहे.
बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसीला पाठिंबा देण्यास किंवा त्यांचा पाठिंबा घेण्यास नकार दिला आहे. ममता बॅनर्जी यांच्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि जातीय राजकारणाला जागा मिळू लागली.
काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी टीएमसीला पाठिंबा देण्यास नकार दिल्यानं भाजपला मदत होईल का? यावर उत्तर देताना चौधरी म्हणाले, की अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला भाजप आणि टीएमसी हातमिळवणी करताना दिसेल. ते म्हणाले, जशी जुन्या वाईनची चव अधिक चांगली लागते, त्याचप्रमाणे जुने मित्र विश्वास ठेवण्यासारखे असतात. टीएमसी आणि भाजप जे याआधी सोबती होते, ते हातमिळवणी करताना दिसतील. ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.