… तेव्हा मनोजकुमार यांनी शाहरुख विरोधात ठोकला 100 कोटींचा दावा; काय होतं प्रकरण

Manoj Kumar Shahrukh Khan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ भारतीय अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचे शुक्रवारी निधन (Manoj Kumar Passes Away) झालं. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांच्यवर उपचार सुरु होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मावळली. मनोज कुमार हे त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जात होते. ते शांत आणि संयमी होते. परंतु २००७ मध्ये अशी एक घटना घडली कि मनोज कुमार यांचा पारा चढला आणि बॉलीवूडचा किंग शाहरुख खानवरच ते भडकले…. वाद इतका टोकाला गेला कि मनोज कुमार यांनी शाहरुख खान (Shahrukh Khan) विरोधात १०० कोटींचग मानहानीचा दावा सुद्धा ठोकला होता. नेमकं काय घडलं ते आपण जाणून घेऊयात….

२००७ साली आलेल्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातील एका सीनमुळे त्यांना मोठा धक्का बसला. या चित्रपटात शाहरुख खानने त्यांची मिमिक्री केली होती. यात मनोज कुमार यांच्या प्रसिद्ध स्टाइलप्रमाणे हाताने चेहरा झाकण्याचा सीन होता. संपूर्ण भारत आणि बाहेरही स्टँड-अप कॉमेडियन आणि मिमिक्री कलाकारांसाठी ही एक व्यापकपणे कॉपी केलेली शैली आहे. चित्रपटात, मनोज कुमारची भूमिका करणारा एक अभिनेता एका कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी येतो जिथे गार्ड त्याला ओळखत नाही कारण तो त्याचा चेहरा झाकत होता. हा प्रसंग पाहिल्यानंतर मनोज कुमार चांगलेच संतापले आणि त्यांनी शाहरुख खान तसेच निर्माते ईरोज इंटरनॅशनल यांच्याविरोधात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला. नंतर निर्मात्यांनी मनोज कुमार यांना पटवून दिल्यानंतर ही नाराजी बाजूला ठेवण्यात आली. शाहरुख खानने सुद्धा मनोज कुमार यांची माफी मागितली. मनोज कुमार यांचा अपमान करण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचे शाहरुखने सांगून टाकलं. चित्रपटातील मनोज कुमार यांच्या मिमिक्रीचा सिन काढून टाकण्यात आला. मनोज कुमार यांनीही शाहरुखला माफ केले आणि हे प्रकरण कोर्टाबाहेर मिटले.

परंतु, नंतर या प्रकरणात पुन्हा ट्विस्ट आला…. भारतात जरी मनोज कुमार यांच्या मिमिक्रीचा सिन काढून टाकण्यात आला असला तरी जपान मध्ये जेव्हा ओम शांती ओम प्रदर्शित झाला तेव्हा त्यामध्ये पुन्हा एकदा हा सीन दाखवण्यात आला… त्यामुळे मनोज कुमार यांचा पारा चांगलाच चढला. मनोजकुमार याना स्वतःची फसवणूक झाल्यासारखं वाटलं. त्यांनी म्हंटल. शाहरुख खान आणि निर्मात्यांनी कोर्टाच्या आदेशाचा अपमान केला आहे. मी त्याला कधीही माफ करणार नाही.” हे प्रकरण काही दिवस गाजले, मात्र पुढे त्यावर अधिक चर्चा झाली नाही. आज मनोज कुमार यांच्या निधनानंतर पुन्हा एकदा या प्रकरणाची चर्चा सुरु झाली.