‘या’ जिल्ह्यात 101 एस.टी. कर्मचारी करण्यात आले बडतर्फ, आणखी 500 कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीवर सुनावणी सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या एस.टी. संपातील कर्मचाऱ्यांवर आता सांगलीत बडतर्फीची कारवाई करण्यात येत आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी २०१ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. दि. १५ फेब्रुवारीपर्यंत १ हजार ६०० कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. एस.टी. महामंडळाचे कर्मचाऱ्यांसह शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांनी संपाचा पवित्रा घेतला आहे.

कर्मचाऱ्यांकडून विलिनीकरणासाठी एकाकी झुंज सुरू आहे. जिल्ह्यात विलिनीकरणासाठी अडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या १ हजार ६०० च्या घरात आहे. तर कारवाईच्या बडगा उगारल्यानंतर २ हजार २०० कर्मचारी सेवेत रुजू झाले आहेत. विलिनीकरण केल्याशिवाय सेवेत येणार नसल्याच्या भूमिकेत असलेल्या कर्मचाऱ्यांवर आता महामंडळाकडून कारवाई करण्यात आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी या दोन दिवसात जिल्ह्यातील १०१ कर्मचारांना बडतर्फ करण्यात आले. यामध्ये चालक, वाहक, वर्कशॉप कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सध्या आणखीन ५०० कर्मचाऱ्यांची सुनावणी सुरू असून त्यांना ५ फेब्रुवारीपर्यंत बडतर्फ केले जाणार आहे. उर्वरित १ हजार २०० गैरहजरकर्मचाऱ्यांवर १५ फेब्रुवारीपर्यंत बडतर्फीची कारवाई करण्यात येणार आहे. चालक, वाहक, वर्कशॉप आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. शिस्त व आवेदन कार्य पद्धतीनुसार ही कारवाई केली जाणार आहे.

Leave a Comment