कोर्टातून आम्हांला बऱ्याच गोष्टी करता येतात; भाजप आमदाराच्या विधानाने खळबळ

0
122
fadanvis chandrakant patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | न्यायालयाचे दिलासे हे एका विशिष्ट पक्षालाच कसे असतात असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला असतानाच भाजप आमदार संजय कुटे यांनी राऊतांच्या दाव्याला बळ मिळेल अस वक्तव्य केले आहे. कोर्टातून आम्हांला बऱ्याच गोष्टी करता येतात, ते आम्ही करू असे विधान संजय कुटे यांनी केले आहे. ते जळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी संजय कुटे म्हणाले, आम्हाला माहीत आहे, शासन, प्रशासन, पोलीस यंत्रणा आमच्या विरोधात कितीही वापरल्या तरीही कोर्ट आमच्यासाठी आहे. कोर्टातून आम्हाला न्याय मिळतो. कोर्टातून आम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतात. आम्हाला काय करायचं ते आम्ही भविष्यात करणार आहोत. कुटे यांच्या या वक्तव्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून कोर्टाबद्दल त्यांना इतका आत्मविश्वास कसा हा प्रश्न विचारला जात आहे.

दरम्यान, संजय कुटे यांच्या विधानानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. फडणवीसांचे उजवा हात असलेले संजय कुटे म्हणतात, न्यायालयात आमचे वजन आहे. भाजप नेत्यांना मिळत असलेला दिलासा पाहता ते वजन कसले आहे, हे आम्ही पाहत आहोत. दिशा सालियन, मुंबै बँक ते आयएनएस विक्रांत घोटाळा अशा सर्व प्रकरणांमध्ये भाजप नेत्यांना रांगेने दिलासा मिळत आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेवर दबाव आणला जात आहे किंवा न्यायव्यवस्थेत आपल्या विचारसरणीची लोकं बसवण्यात आली आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतो असेही संजय राऊत यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here