संपूर्ण भारतात कमळ फुलवणार; नवनिर्वाचित भाजप अध्यक्षांचा निर्धार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महराष्ट्र : नवनिर्वाचित भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी संपूर्ण भारतात कमळ फुलविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दिल्लीतील भाजपच्या मुख्य कार्यालयात कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. नड्डा यांनी भाजप अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल पक्षाचे आभार मानले. प्रेम, विश्वास, सहयोग केल्याबद्दल मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो, अशा शब्दात भाजप अध्यक्षांनी आभार व्यक्त केले. नड्डा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या संघटनेने जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे काम करण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि इतर अनेक नेते आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत नड्डा म्हणाले की, मला कोणत्याही राजकीय कुटुंबाची पार्श्वभूमी नाही. तरी देखील मी एका एवढ्या मोठ्या पक्षाचा अध्यक्ष झालो आहे. हे फक्त भाजपमध्येच होऊ शकते.

नड्डा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा करतानाच सांगितले होते की आपला पक्ष इतर पक्षांपेक्षा कसा वेगळा आहे. आम्ही फक्त पक्षांच्या या नीतींमुळेच वेगळे नाही आहोत तर या वेगळ्या नीतीचे चांगले फलित देखील पाहायला मिळत आहे. माझ्या सारखा खेड्यातील एक सामान्य कार्यकर्ता गावाकडून येऊन भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष होतो हीच भाजपची खासियत आहे.

Leave a Comment