नवी दिल्ली । देश एका बिकट परिस्थितीतून जात आहे. देशावर कोरोनाच संकट असून अशा चिंताजनक वातावरणात एक दिलासादायक माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत ही दिली. देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत ४० टक्के घट झाली असल्याचे लव अग्रवाल यांनी सांगितलं. गेल्या २४ तासात कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ७ ने वाढून १३ हजार ३८७ इतकी झाली आहे. ज्या वेगान कोरोनाग्रस्तांची वाढ गेल्या काही दिवसात पाहायला मिळत होती त्यापेक्षा हे प्रमाण आता कमी झालं असल्याचं आकडेवारीवरून लक्षात आल्याचं लव अग्रवाल यांनी सांगितलं.
याचसोबत गेल्या २४ तासात देशात २३ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे असंही पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलं आहे. देशात करोना रुग्णांच्या संख्येत ४० टक्के घट झाली आहे. आपण करोनाशी कसोशीने लढा देत आहोत असंही लव अग्रवाल यांनी म्हटलं आहे. १५ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत आढळलेले रुग्ण आणि १ एप्रिलपासून आजपर्यंत आढळलेले रुग्ण यांची तुलना केली असता एप्रिल महिन्यात हे प्रमाण कमी झाल्याचं दिसतं आहे. आपण चाचण्यांची संख्या वाढवली आहे तरीही कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं दिसून येतं आहे असंही अग्रवाल यांनी स्पष्ट केलं.
We have been witnessing average growth factor at 1.2 since April 1 which stood at 2.1 (average) between March 15- March 31. Hence, there is 40 per cent decline in average growth factor even as we increased #COVID19 testings: Lav Aggarawal, Joint Secretary, Union Health Ministry pic.twitter.com/kQMzIcX1xI
— ANI (@ANI) April 17, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”