सडावाघापूर धबधब्याच्या धोकादायक कड्यावर युवकांची हुल्लडबाजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

पाटण तालुक्यातील तारळे-पाटण रोडवर पाटणपासून 14 ते 15 किलोमीटर अंतरावर सडावाघापूरचा उलटा धबधबा आहे. सध्या मुसळधार पावसामुळे येथील निसर्ग व धबधबा पर्यटकांना खुणावत आहे. पर्यटकही येथील धबधब्यासह परिसर पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. मात्र, या ठिकाणी काही तरुणांकडून उल्लडबाजी केली जात असल्याने त्याचा पर्यटकांना त्रास होत आहे.

सडावाघापूर येथील उलट्या धबधब्याच्या ठिकाणी दररोज 4 ते 5 हजार पर्यटकांकडून हजेरी लावली जात आहे. या ठिकाणी पावसात भिजत त्यांच्याकडून आनंद लुटला जात आहे. मात्र याठिकाणी पर्यटकांप्रमाणे महाविद्यालयीन तरुणही येत असून त्यांच्याकडून हुल्लडबाजी केली जात आहे. वाहनातील टेपवर मोठ्या आवाजात गाणी लावून जाणीवपूर्वक पर्यटकांना त्रास दिला जात आहे.

तरुणांकडून उलट्या धबधब्याच्या कड्यावर जाऊन हूल्लडबाजी केली जात असल्यामुळे पाय घसरून दरीत पडण्याच्या शक्यताही नाकारता येत नाही. मात्र, हुल्लडबाजांना याचे भान नसल्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. येथील तरुणांकडून केल्या जाणाऱ्या हुल्लडबाजीला छाप लावण्यासाठी पोलिसांनी आणि वन विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे.

Leave a Comment