मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अजित पवार यांनी मनसेला महाआघाडीत घेण्यासाठी प्रस्ताव पाठविला होता. मात्र मनसे आणि आमचे विचार वेगवेगळे असल्याकारणाने काँग्रेस ने त्यांना महाआघाडीत येण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा मनसेला महाआघाडीत घेण्याचं प्रयत्न फसला आहे.
मनसेला महाआघाडीत स्थान नसल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि संजय निरुपम यांनी राष्ट्रवादीला कळविले आहे. समविचारी पक्षांनीं मिळुन ही महाआघाडी स्थापन केली आहे. वेगळ्या विचारांच्या पक्षांना यात प्रवेश नाही असे काँग्रेस ने सांगितले. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांचा प्रयत्नाला यश आले नाही.
प्रकाश आंबेडकर यांना चार जागा दिल्या आहेत, त्यांच्या उत्तराची वाट आम्ही पाहत आहोत असे चव्हाण यांनी सांगितले.
इतर महत्वाचे –
शरद पवारांसमोर कार्यकर्त्यांचा राडा
पंतप्रधान मोदी यांना २०१८ चा सोल पीस पुरस्कार मिळाला