नवी दिल्ली । कोरोना संकटाच्या वेळी आपल्याकडे सणासुदीच्या हंगामात खरेदीसाठी पुरेसे पैसे नसल्यास काळजी करू नका. भारतीय डिजिटल वॉलेट कंपनी मोबिक्विक (Mobikwik) यांनी कार्ड कंपनी अमेरिकन एक्सप्रेससह (American Express) एकत्रितपणे आपले पहिले ‘मोबिक्विक ब्लू अमेरिकन एक्सप्रेस कार्ड’ (MobiKwik Blue American Express Card) सादर केले आहे. या कार्डचे क्रेडिट लिमिट (Credit Limit) 1 लाख रुपयांपर्यंत ठेवले गेलेले आहे. हे डिजिटल प्रीपेड कार्ड असेल असे कंपनीने म्हटले आहे. हे कार्ड मोबिक्विक वॉलेटशी (Mobikwik Wallet) जोडले गेलेले आहे.
फायनान्स टेक कंपनी बनण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल
मोबिक्विकच्या सह-संस्थापक आणि सीओओ उपासना टाकू म्हणाल्या की, हे ब्लू कार्ड मोबिक्विक पूर्णपणे फायनान्स टेक कंपनी (FinTech Company) बनण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. अमेरिकन एक्सप्रेसच्या सामरिक गुंतवणूकीचे अॅमेक्स वेंचर्स (Amex Ventures) यांनी मोबिक्विकमध्ये गुंतवणूक केलेली आहे. अमेरिकन एक्सप्रेसचे उपाध्यक्ष तसेच भारत आणि दक्षिण आशियासाठी ग्लोबल नेटवर्क सर्व्हिसेसच्या प्रमुख दिव्या जैन यांनी सांगितले की, आमचे प्रयत्न सतत नाविन्यपूर्ण भागीदारी बनवणे आहेत. आमच्या विद्यमान ग्राहकांना सर्वात आकर्षक प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस उपलब्ध करून द्यायचे आहेत.
व्हर्च्युअल प्रीपेड कार्डसाठी सहजपणे अर्ज करा
या कार्डवर ग्राहकांना 1 लाख रुपयांपर्यंतची इन्स्टंट क्रेडिट (Instant Credit) उपलब्ध करुन दिली जाईल. आतापर्यंत मोबीक्विक ब्लू अमेरिकन एक्सप्रेस कार्ड हे सुमारे 2 लाख युझर्सना देण्यात आलेले आहेत. जर आपणही या कार्डसाठी अर्ज करू इच्छित असाल तर पहिले मोबिक्विक अॅप डाउनलोड करा. आधीपासून वापरत असलेले युझर्स आपले अॅप अपडेट करा. चला तर मग या कार्डसाठी अर्ज करण्याचा संपूर्ण मार्ग जाणून घेउयात …
> मोबिक्विक अॅप डाऊनलोड करा. जुने ग्राहक त्यांच्या स्मार्टफोनमध्ये असलेले अॅप अपडेट करा.
> अॅपमध्ये लॉगिन किंवा साइन अप करा. यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर अॅपवर रजिस्टर करावा लागेल.
> रजिस्टर्ड क्रमांकावर एक ओटीपी येईल. तो टाकताच, आपण अॅपवर रजिस्टर व्हाल.
> अमेरिकन एक्सप्रेसचा लोगो मुख्य स्क्रीनवर उजव्या कोपऱ्यात दिसेल. या लोगोवर क्लिक करा
> आपण अमेरिकन एक्सप्रेस लोगो वर क्लिक करताच आपले व्हर्च्युअल प्रीपेड कार्ड अॅक्टिवेट होईल.
> हे कार्ड यूजर्सना 10 हजार रुपयांच्या खरेदीवर 1 टक्के सुपर कॅश आणि दिवाळी खरेदीवर 20 टक्के बचत देण्यात येत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.