यंदा दिवाळीत करा फराळासाठी खमंग खुसखुशीत तांदळाच्या चकल्या..

#HppyDiwali | दिवाळी म्हटलं की घराघरात लगबग सुरू होते. घराची साफसफाई, कंदिल लावणं, रांगोळ्या काढणं यांसारख्या गोष्टींची तयारी केली जाते. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे दिवाळीचा फराळ. चिवडा, वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, करंज्या आणि सर्वात महत्त्वाचं सर्वांच्याच आवडीची चकली यांसारख्या पदार्थांची सर्वांच्याच घरात रेलचेल असते. लहान मुलांपासून ते घरातील थोरामोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी गोल चकली … Read more

यंदाच्या दिवाळीत बनवा मुगाच्या पिठाचे पौष्टिक लाडू

दिवाळी म्हटलं कि फराळ आलं. चकल्या, चिवडा, शंकरपाळी असं बरच काही. मात्र जर या फराळात काही पौष्टिक पदार्थांची भर घातली तर. आज आपण असाच एक पौष्टिक पदार्थ बघणार आहोत तो म्हणचे मुगाच्या पिठाचे पौष्टिक लाडू. लाडू हा पदार्थ तसा लहान मुलांना चटकन आवडणारा आणि घरातील वृद्ध व्यक्तींना सहज खाता येणारा. त्याला जर पौष्टिकतेचे जोड दिली तर आरोग्याच्या दृष्टिने हा एक उत्तम दिवाळी फराळ होईल. चला तर जाणून घेऊया मुगाच्या पिठाचा पौष्टिक लाडू कसा तयार करतात ते..

माझ्यासाठी दिवाळी म्हणजे…!

लहानपणी दिवाळी हा फक्त उत्सव नव्हता, डोक्यावर घमेल्या मधे मती आणणे, किल्ले बनविणे, दिवाळीत नवीन कपडे घेणे, फटाके फोडणे, दीवाळी उत्सव नव्हता तर भावना होती. पहिला फटका फोडण्यासाठी सकाळी लवकर उठणे ही त्यावेळी स्पर्धा होती. आपल्या किल्ल्यावर लक्ष्य ठेवणे ते ही शेवटच्या दिवसापर्यंत आणी त्याचे रक्षण करणे ही माझ्यासाठी दिवाळी होती, मला दिवाळीच्या फराळात जास्त रस नव्हता. माझ्या बालेकिल्ल्यात तोफ, धबधबा, एरगन आदी मॉडेल्स वापरण्यासारख्या माझ्या आवडी भिन्न होत्या. मी माझे सर्व अभ्यास शाळेतच पूर्ण करायचो जेणेकरून मी किल्ला बांधण्यासाठी अधिक वेळ देऊ शकलो, किल्ले बनवताना मी संपूर्ण महिना अगोदर पासून तैयारी करायचो. किल्ल्यांकडे मला बरीच बक्षिसे मिळाली. हे माझे कौशल्य आता बालापासूनच्या तरुणाई पर्यंतचा प्रवासात गमावले आहे.

यंदा दिवाळी फराळात ट्राय करा कुरकुरीत ‘खजुऱ्या’

पश्चिम महाराष्ट्रात खजुऱ्या हा पदार्थ आवर्जून केला जायचा. दिवाळसोबत चाहूल लागते ती थंडीची. बाजरी उष्ण असल्यानं महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दिवाळीच्या फराळासाठी बाजरीचा उपयोग करण्यात येतो. खजुऱ्यासुद्धा बाजरीच्या पीठाच्या केल्या जातात.

प्रादेशिक वेगळेपण जपणारी ‘भारतीय’ दिवाळी

भारत हा विविधतेने नटलेला देश. प्रत्येक कोसावर येथील संस्कृती,परंपरा,चालीरीती यांत भिन्नता आढळते. त्यात सण उत्सव-साजरे करण्याबाबत विचार करायचा झाला तर त्यात बऱ्याच समान गोष्टीं सोबत वेगळेपण जाणवते. प्रत्येक प्रदेशात सण साजरे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. दिवाळी हा त्यापैकीच एक सण जो संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहाने साजरा होतो. विशेष म्हणजे तो साजरा करण्याच्या कालावधीत सुद्धा प्रदेशवार … Read more

दिवाळी म्हणजे नक्की काय रे भाऊ?

दिवाळी भारतातील प्राचीन आणि सर्वात प्रसिद्ध सणांमधील एक आहे. हिंदू धर्मात दिवाळीला विशेष महत्व दिले आहे. दिवाळी या शब्दाचा अर्थ “रोशनाईचा सण’ किंवा “दिपोत्सव” असा आहे. संस्कृतमध्ये दिवाळी शब्दास “दिपावली” असा अर्थ मानला जातो. याचा अर्थ “दिव्यांची रांग” असा केला जातो. भारतात वेगवेगळ्या धर्माचे लोक आपल्या चालीरीती प्रमाणे यास साजरा करतात त्यामुळे या सणाला प्रत्येकाच्या घरी आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. पाच दिवस चालणारा हा उत्सव फारच मनोरंजक असतो. लोक एक दोन आठवड्या आधीच दिवाळीची तयार सुरु करून देतात त्यामध्ये त्यामध्ये घराची साफसफाई आणि रंगरंगोटी चा समावेश होतो. कपडे आणि जरुरी वस्तू एक-दोन आठवड्या पूर्वीच खरेदी केले जातात. घरात आणि दुकानात फुलांनी आणि आंब्याच्या पानांच्या तोरणांनी सजवले जाते. आकाश कंदील घरासमोर लावल्या जातो. सुंदर रांगोळी काढल्या जाते. विविध रंगांनी ती सजवली जाते.

वॉटरप्रूफ फटाके आणायचे कुठून?? पावसाने फटाका स्टॉलवाले हवालदिल

पावसाने संपूर्ण राज्यात हाहाकार माजवलेला आहे. दिवाळीच्या सणानिमीत्त ४ पैसे कमावू या विचारात असणाऱ्या फटाका विक्रेत्यांवर ऐन दिवाळीत पावसाने संक्रांत आणली आहे. पत्र्याच्या शेडमध्ये फटाके विक्रीस ठेवणाऱ्या पुण्यातील फटाका स्टॉलवाल्यांना पाऊस आणि थंडी अशा दोन्ही संकटांचा सामना यानिमित्ताने करावा लागत आहे. डेक्कन परिसरात भिडे पूल ओलांडल्यानंतर ओंकारेश्वर मंदिराजवळ फटाका विक्रेत्यांना दरवर्षी जागा उपलब्ध करून देण्यात येते. ही जागा साधारण दोन महिन्यांपूर्वी झालेल्या पावसाने पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. आताही पावसाचा जोर असाच राहिला तर फटाका विक्रेत्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

दिवाळीत देशभरातील दुकानांमध्ये आली चमक, झाला 72 हजार कोटींचा व्यवसाय

Happy Diwali

नवी दिल्ली । कोरोना कालावधीत दुकानांवर कमी ग्राहक आल्यामुळे शांतता होती, पण दिवाळीमुळे पुन्हा व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. देशभरात सुमारे 72 हजार कोटी रुपयांचा व्यापार झाल्याची माहिती कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने दिली. एवढेच नव्हे तर यंदाची दिवाळीही या दृष्टीने विशेष आहे कारण चीनने देशाला खोल आर्थिक पराभव पत्करावा लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी … Read more

दिवाळीच्या दिवशी ग्राहकांच्या ‘या’ हालचालीमुळे दुकानदार खूश आहेत, असा अंदाज बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे

Happy Diwali

नवी दिल्ली । कोरोना-लॉकडाऊनमुळे बाजारपेठ कशीही असू असो, तरीही दुकानदार आनंदी आहेत. त्यांच्या आनंदाचे कारण म्हणजे चिनी वस्तूंवरचा बहिष्कार आणि घरगुती वस्तूंची विक्री. याचे उत्तम उदाहरण म्हणजे चायनीज झालरमध्ये इंडियन मेड स्टिकर लावून ते विकले जात आहे. त्याचबरोबर, बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की दिवाळीच्या वेळी चीनला धक्का देण्याबरोबरच भारतीय बाजार किमान 60 हजार कोटींचा व्यवसाय … Read more

सणासुदीच्या हंगामात खरेदीसाठी पैसे नाहीत, तर मग ‘या’ Mobikwik कार्डवर मिळेल 1 लाख रुपयांपर्यंतचे Instant Credit

नवी दिल्ली । कोरोना संकटाच्या वेळी आपल्याकडे सणासुदीच्या हंगामात खरेदीसाठी पुरेसे पैसे नसल्यास काळजी करू नका. भारतीय डिजिटल वॉलेट कंपनी मोबिक्विक (Mobikwik) यांनी कार्ड कंपनी अमेरिकन एक्सप्रेससह (American Express) एकत्रितपणे आपले पहिले ‘मोबिक्विक ब्लू अमेरिकन एक्सप्रेस कार्ड’ (MobiKwik Blue American Express Card) सादर केले आहे. या कार्डचे क्रेडिट लिमिट (Credit Limit) 1 लाख रुपयांपर्यंत ठेवले … Read more