“GST महसूल संकलनात आता कायमस्वरूपी वाढ झाली पाहिजे”- अर्थमंत्री निर्मला सीतारमण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी गुरुवारी सांगितले की,”अलिकडच्या काही महिन्यांतील महसूल वसुलीत झालेली वाढ आता कायमस्वरुपी असावी. GST फसवणूकीचा योग्य प्रकारे सामना केल्याबद्दल त्यांनी टॅक्स अधिकाऱ्यांचे कौतुक केले. GST च्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त टॅक्स अधिकाऱ्यांना पाठविलेल्या मेसेजमध्ये सीतारमण म्हणाल्या की,”गेल्या चार वर्षांत करदात्यांचा आधार जवळपास दुप्पट 66.25 लाखांवरून 1.28 कोटी झाला आहे.”

त्या म्हणाल्या की,”सलग आठ महिन्यांचा GST महसूल एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि एप्रिल 2021 मध्ये 1.41 लाख कोटी रुपयांचे GST महसूल संकलन झाले. सीतारमण म्हणाल्या, “गेल्या वर्षी सोयी-सुविधा आणि अंमलबजावणी या संदर्भात कौतुकास्पद काम केले गेले असून, फसवे व्यापारी आणि आयटीसी वर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. अलिकडच्या काही महिन्यांत झालेला वाढीव महसूल संग्रह आता कायमस्वरूपी असावा. ”

कोविड -19 च्या सर्व आव्हानांदरम्यान GST अंमलबजावणीबद्दल अर्थमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले आणि करदात्यांना पाठींबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. त्यांनी GST लागू केल्याबद्दल केंद्र आणि राज्य या दोन्हीच्या टॅक्स अधिकाऱ्यांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की,”भारतासारख्या मोठ्या आणि वैविध्यपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात कोणतीही सुधारणा करणे अत्यंत आव्हानात्मक असू शकते.”

अर्थ मंत्रालय 54,000 हून अधिक GST करदात्यांना वेळेवर रिटर्न्स भरण्यासाठी आणि टॅक्सचे रोख पैसे भरल्याबद्दल प्रशंसा प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करेल. या ओळखल्या गेलेल्या करदात्यांपैकी 88 टक्क्यांहून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक आहेत. यात सूक्ष्म (36 टक्के), लहान (41 टक्के) आणि मध्यम प्रमाणात उद्योजक (11 टक्के) यांचा समावेश आहे. हे उद्योजक वेगवेगळी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत जेथे ते वस्तूंचा पुरवठा आणि सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून काम करतात. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ (CBIC) या करदात्यांना प्रशंसा प्रमाणपत्र देईल.

मंत्रालयाने म्हटले आहे की,” GST लागू झाल्यापासून आतापर्यंत 66 कोटींपेक्षा जास्त रिटर्न दाखल झाले आहेत. GST अंतर्गत दर कमी असल्याने कर अनुपालन वाढले आहे. यादरम्यान GST महसूल हळूहळू वाढत गेला आणि गेल्या आठ महिन्यांपासून तो सतत 1 लाख कोटींच्या वर राहिला आहे.”

देशात 1 जुलै 2017 रोजी GST सिस्टीम लागू करण्यात आली. अप्रत्यक्ष कराच्या क्षेत्रात एक मोठा बदल म्हणून ही सिस्टीम सुरू केली गेली. एक्साईज ड्यूटी, सर्व्हिस टॅक्स, व्हॅट तसेच केंद्र आणि राज्य स्तरावर आकारण्यात येणाऱ्या 13 सेसप्रमाणे GST मध्ये एकूण 17 प्रकारचे टॅक्स समाविष्ट केले गेले आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment