गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ; जाणून घ्या आजचा दर

0
99
gas
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना आता कमर्शियल गॅसच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. कमर्शियल गॅसच्या दरात 105 रुपयांची वाढ झाली असून महागाईचा भडका उडाला आहे.सरकारी तेल कंपन्यांनी मार्च महिन्यासाठी LPG गॅस सिलेंडरच्या किमती जाहीर केल्या असून सर्वसामान्याना झटका दिला आहे.

तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. देशातील सर्वात मोठी कंपनी इंडियन ऑइल (IOC) ने 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 105 रुपयांनी वाढ केली आहे. किमतीत वाढ झाल्यानंतर नवी दिल्लीत 19 किलो गॅस सिलिंडरचा नवा दर 2,012 रुपये झाला आहे. नवीन किमती 1 मार्च 2022 पासून लागू झाल्या आहेत.

तर दुसरीकडे घरगुती गॅस च्या दरात अद्याप कोणतीही वाढ झाली नसून थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आज १ मार्च २०२२ रोजी घरगुती वापराच्या १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती सिलिंडरच्या किमती डिसेंबर २०२१ नुसार स्थिर आहेत. मुंबई आणि दिल्लीत १४.२ किलो सिलिंडरचा दर ९०० रुपये आहे. कोलकात्यात ९२६ रुपये आणि चेन्नईत ९१६ रुपये दर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here