Wednesday, June 7, 2023

थेट विमानातच 6 प्रवाशांमध्ये गावठी स्टाईलमध्ये हाणामारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये फ्लाइटमध्ये काही जण एकामेकाला मारताना (Free Style Fight) दिसत आहेत. ते एकमेकांना जोरात धक्काबुक्की करत आहेत. फ्लाइटच्या आतून लोकांच्या किंकाळ्यासुद्धा ऐकू येत आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
बहुतेक प्रवासी फ्लाइटच्या आत या गोष्टीचा विचार करत असतात की, आकाशात विमान असताना कोणतीही अडचण येऊ नये. या प्रवासादरम्यान क्रू मेंबर्स आणि पायलट सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेत असतात. मात्र यामध्ये देखील असे काही करामती प्रवासी असतात जे विमानामध्येदेखील मारामारी (Free Style Fight) करू शकतात. त्यांच्या या कृतीमुळे बाकी प्रवाशांना मोठा मनस्थाप सहन करावा लागतो. अशीच एका घटना KLMच्या फ्लाइटमध्ये घडली आहे. अचानक या फ्लाइटमधील 6 प्रवाशांमध्ये भांडण झाले. त्यांनी विमानाच्या मध्यभागी एकमेकांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

हे विमान मँचेस्टरहून अ‍ॅमस्टरडॅमला जात होते. यादरम्यान हा सगळा प्रकार घडला आहे. या व्हिडिओमध्ये विमानाच्या आतून घाबरलेल्या लोकांच्या ओरडण्याचा-किंचाळण्याचा आवाज ऐकू येत आहे. हे भांडण सुरु असताना विमानातील एक क्रू मेंबर भांडण सोडवण्यासाठी येतो मात्र त्यालादेखील काहीच करता येत नाही. या लोकांची गावठी स्टाईलने मारहाण (Free Style Fight) सुरूच होती. या प्रवाशांमध्ये नेमके कोणत्या कारणावरून भांडण झाले हे मात्र समजू शकलेले नाही. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे पाहून क्रू मेंबरने फोन करून पोलिसांना याची माहिती दिली आणि त्या 6 मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

हे पण वाचा

वर्षातील पहिले चंद्रग्रहण लवकरच; तारीख, वेळ आणि सुतक कालावधी जाणून घ्या

15 दिवसांत पैसे डबल…; ‘या’ कंपनीच्या शेअर्सने केली कमाल

वेडात मराठे ‘वीर दौडले सात’! शिवरायांच्या पराक्रमी वीरांचा जाज्वल्य इतिहास रुपेरी पडद्यावर झळकणार

Google Recruitment 2022 : IT फ्रेशर्ससाठी भारतात मोठी संधी

हवा भरताना JCB चा टायर फुटला, दोघांचा मृत्यू