हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नवीन वर्ष सुरू झाले की काही विशिष्ट क्षेत्रातील नियमावतील बदल होतात. या बदलांचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशाला पडतो. तर अनेकवेळा बदलणारे नियम सर्वसामान्य जनतेसाठी फायदेशीर ठरतात. यावर्षी देखील एक जानेवारीपासून अनेक नियम बदलणार आहेत, तर काही नियम लागू होणार आहेत. ते कोणते असतील जाणून घेऊयात.
सिम कार्ड खरेदी
नवीन वर्षामध्ये नवीन सिम कार्ड खरेदीसाठी डिजिटल केवायसी अनिवार्य असणार आहे. तुम्हाला जर एखादे नवीन सिम कार्ड खरेदी करायचे असेल तर त्यासाठी सरकारने आखून दिलेली पूर्ण प्रक्रिया करावी लागेल. तुम्हाला सहज कोणत्याही सोप्या पद्धतीने नवीन सिम कार्ड खरेदी करता येणार नाही. नव्या सिम कार्ड खरेदीसाठी ग्राहकांना बायोमेट्रिक डेटा देणे बंधनकारक असेल. तसेच, बनावट सिम कार्ड वापरणाऱ्यांना तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांपर्यंतचा दंड बसेल.
UPI खाते
जे वापर करते गेल्या एक वर्षापासून किंवा त्यापेक्षा जास्त काळ Google Pay, Paytm आणि PhonePe वापरत नसतील तर त्यांचे UPI आयडी आणि नंबर निष्क्रिय करण्याचे आदेश नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने दिले आहे. यासाठीची अंतिम तारीख 31 डिसेंबर अशी आहे.
बँक लॉकर नियम
31 डिसेंबर पर्यंत बँकांमध्ये लॉकर असलेल्या ग्राहकांना सुधारित बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करून संबंधित रक्कम जमा करावी लागणार आहे. ग्राहकाने तसे न केल्यास एक जानेवारीपासून त्यांचे लॉकर बंद करण्यात येईल. त्यामुळे ग्राहकांनी त्वरितच बँकेत जाऊन बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करावी.
विमा पॉलिसी
विमा नियामकने 1 जानेवारीपासून सर्व विमा कंपन्यांना विमा ग्राहकांना ग्राहक माहिती पत्रक देण्याचे निर्देश जारी करण्यात आली आहेत. यामध्ये विम्याशी संबंधित सर्व माहिती ग्राहकांना सोप्या पद्धतीने समजून सांगावी असे आदेश देण्यात आले आहेत
आयकर रिटर्न
आजवर ज्या करदात्यांनी 2022-23 आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न भरले नाहीत अशांना 1 जानेवारीपासून उशीर झालेले रिटर्न्स भरता येत नाही. तसेच ज्या करदात्यांच्या रिटर्न्समध्ये त्रुटी आहेत त्यांना देखील सुधारित रिटर्न्स भरता येणार नाही.