हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : कोटक महिंद्रा बँक आणि पंजाब नॅशनल बँके (PNB) कडून आपल्या FD वरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर दोन्ही बँकांकडून ही वाढ करण्यात आली आहे. हे लक्षात घ्या कि, 5 ऑगस्ट रोजी RBI कडून रेपो दरात वाढ कऱण्यात आली होती. ज्यानंतर अनेक बँका आणि NBFC संस्थांनी आपल्या FD वरील व्याजदर वाढवले आहेत. ही दर वाढ 17 ऑगस्ट पासून लागू होणार आहे.
पंजाब नॅशनल बँकेने आता एका वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या FD वरील व्याजदर 0.20 टक्क्यांनी वाढवला आहे. त्यावर आता 5.50 टक्के व्याज दिले जाईल. तसेच बँकेने 1 वर्षापेक्षा जास्त आणि 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वरील व्याजदर 0.15 टक्क्यांनी वाढवले आहेत. ते आता 5.45 टक्क्यांवरून 5.50 टक्के करण्यात आले आहेत. Bank FD
दोन वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपर्यंतच्या FD वर बँकेकडून 5.60 टक्के व्याज दिले जाईल. यामध्ये 0.10 टक्के वाढ झाली आहे. त्याच बरोबर 3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी आता बँकेच्या FD वरील व्याजदर 5.75 टक्केच राहतील. 1,111 दिवसांच्या डिपॉझिट्सवर 5.75 टक्के व्याज मिळेल. त्याच वेळी, 5 ते 10 वर्षांपेक्षा जास्तीच्या कालावधीसाठीचा व्याजदर 5.60 टक्के आहे. हे लक्षात घ्या कि, बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 0.50 टक्के व्याज दिले जाईल. Bank FD
कोटक महिंद्रा बँकेचे व्याजदर जाणून घ्या
कोटक महिंद्रा बँकेकडून एफडीवरील व्याजदरात 0.15 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. आता बँकेकडून 365 ते 389 दिवसांच्या कालावधीसाठीचा व्याजदर 0.15 टक्क्यांनी वाढून 5.75 टक्के झाला आहे. 390 दिवस ते तीन वर्षांच्या FD वर आता 5.90 टक्के व्याज मिळेल. Bank FD
याशिवाय कोटक महिंद्रा बँकेने तीन वर्ष ते 10 वर्षांच्या कालावधीसाठीच्या डिपॉझिट्सवरील व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. यासाठी 5.90 टक्केच व्याजदर कायम राहील. तसेच बँकेने आपल्या रिकरिंग डिपॉझिट्सच्या (RD) दरातही वाढ केली आहे. 6 महिन्यांच्या कालावधीसाठी रिकरिंग डिपॉझिट्स वरील व्याजदर 0.25 टक्क्यांनी वाढले आहेत. Bank FD
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.kotak.com/en/personal-banking/deposits/fixed-deposit/fixed-deposit-interest-rate.html
हे पण वाचा :
ई-तिकीटिंग सिस्टीम आणखी वेगवान करण्यासाठी Railway कडून सल्लागार कंपनीची नियुक्ती !!!
Railway कडून आज 142 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे लिस्ट पहा
Milk Price : देशाच्या इतर भागांच्या तुलनेत ‘या’ शहरामध्ये कमी दराने मिळते दूध !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात वाढ, आजचे नवे दर तपासा