Flashback 2023: या 5 अभिनेत्यांनी OTT प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांची मने जिंकली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 2023 साली ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक नवे चेहरे पाहायला मिळाले. तसेच अनेक नव्या वेब सिरीज देखील रिलीज झाल्या. या सगळ्यात काही सर्वोत्कृष्ट कलाकारांनी आपल्या अभिनयातून ओटीपी प्लॅटफॉर्मवर 2023 वर्षे गाजवते. ते कलाकार नेमके कोणते आहेत आपण जाणून घेऊयात.

1) मनोज बाजपेयी – झी 5 वर रिलीज झालेल्या ‘सिर्फ एक बंदा काफी है’ मधील मनोज बाजपेयी यांच्या अभिनयाने सर्वत्र प्रशंसा मिळवली. सिर्फ एक बंदा काफी है प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्यानंतर एक आठवड्यात मनोज बाजपेयी यांच्या अभिनयामुळे चित्रपटाने लोकप्रियता मिळवली. या चित्रपटातील अभिनयामुळे OTT Play Awards 2023 मध्ये मनोज बाजपेयी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

2) जयदीप अहलावत – जाने जान या चित्रपटामध्ये जयदीप याने उत्कृष्ट असा अभिनय केला आहे. करीना कपूर खान आणि विजय वर्मा यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना जयदीप अहलावत याने आपल्या भूमिकेतून एक वेगळी छाप पडली. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून इतर अभिनेत्यांपेक्षा जयदीपच्या भूमिकेचे सर्वात जास्त कौतुक करण्यात आले.

3) शाहिद कपूर – फर्जीमध्ये शाहिद कपूरने सनी या अँटी-हिरोच्या भूमिकेत उत्कृष्ट अभिनय करून एक वेगळी छाप पाडली. या भूमिकेच्या माध्यमातूनच शाहिद कपूरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक वेगळी ओळख मिळाली. त्यामुळे 2023 वर्षात OTT प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शाहिद कपूरचे सनी पात्र सर्वांना आवडले.

4) आशुतोष गोवारीकर – काला पाणी सिरीजमध्ये आशुतोष आशुतोष गोवारीकर यांनी नेता म्हणून सर्वोत्कृष्ट भूमिका साकारली आहे. काला पाणी चित्रपटामध्ये एक नायक म्हणून त्यांनी घेतलेली भूमिका प्रेक्षकांवर वेगळी छाप पडते. काला पाणी चित्रपट देखील प्रेक्षकांच्या तितकाच पसंतीत पडला असल्यामुळे यातील प्रत्येक पात्राला तितकेच लोकप्रियता मिळाली आहे.

5) नवाजुद्दीन सिद्दीकी – हड्डी चित्रपटांमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी याने एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली आहे. या भूमिकेच्या माध्यमातून करण्यात आलेला अभिनय कौतुक करण्या पात्र आहे. या चित्रपटाने जितकी लोकप्रियता मिळाली आहे त्याला एक कारण नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारलेली भूमिका देखील आहे.