वर्ध्यातील ओबीसी सभेकडे छगन भुजबळांनी फिरवली पाठ; राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. परंतु, ओबीसी आरक्षणा धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसींच्या सभा आयोजित केल्या जात आहेत. परंतु सध्या या सभांना ओबीसी बांधवांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाच छगन भुजबळ यांनी सभेकडे पाठ फिरवली आहे.

आज सकाळ ओबीसी भटके विमुक्त संघटनेतर्फे वर्ध्यात सभेचे आयोजन करण्यात आले होते मात्र या सभेला सुरुवात होऊन तीन तास उलटून गेले तरी छगन भुजबळ सभेसाठी आले नाही. त्याचबरोबर या सभेसाठी 25 हजार ओबीसी बांधव येथील अशी शक्यता आयोजकांनी वर्तवली होती. मात्र प्रत्यक्षात दहा हजाराच्या आसपास देखील ओबीसी बांधव सभेसाठी उपस्थित राहिले नाही. तसेच जे बांधव सभेसाठी आले होते ते देखील उन्हामुळे पुन्हा निघून गेले.

मात्र या सगळ्यांमध्ये छगन भुजबळच सभेसाठी हजर राहिल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. सांगितले जात आहे की, छगन भुजबळ यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांना या सभेसाठी हजर राहता आले नाही. परंतु दुसऱ्या बाजूला या सभेसाठी गर्दी न झाल्यामुळे छगन भुजबळ यांनी देखील सभेला जाणे टाळे असे देखील म्हटले जात आहे. त्याचबरोबर, आता उद्या होणाऱ्या ठाणे येथे होणाऱ्या सभेला देखील छगन भुजबळ उपस्थित राहणार नसल्याचे समोर आले आहे.

छगन भुजबळ यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच त्यांना बाहेर फिरण्यास देखील मनाई गेली आहे. या सर्व कारणांमुळे छगन भुजबळ यांना पुढील काही दिवसात आयोजित करण्यात आलेल्या सभांना उपस्थित राहता येणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या ओबीसी सभांना बांधवांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाच छगन भुजबळ यांचे सभेत उपस्थित राहणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे आता छगन भुजबळ ओबीसी बांधवांशी कशा पद्धतीने संवाद साधतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.